मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुण्यात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’; उद्योजकांना व्यवसायवृद्धीची संधी

Pune News :पुणे : अग्रवाल समाज पुणे यांच्या वतीने ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’ या तीन दिवसीय व्यवसाय प्रदर्शनाचे आयोजन १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान डेक्कन कॉलेज मैदान, पुणे येथे करण्यात आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुण्यात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’; उद्योजकांना व्यवसायवृद्धीची संधी
पुण्यात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’; उद्योजकांना व्यवसायवृद्धीची संधी

Pune News : सोच से सफलता तक संकल्पनेवर आधारित प्रदर्शनात उद्योग, व्यवसाय, आरोग्य आणि नेतृत्वावर विविध सत्रांचे आयोजन

Pune News :पुणे : अग्रवाल समाज पुणे यांच्या वतीने ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’ या तीन दिवसीय व्यवसाय प्रदर्शनाचे आयोजन १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान डेक्कन कॉलेज मैदान, पुणे येथे करण्यात आले आहे. ‘सोच से सफलता तक’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांना एकाच व्यासपीठावर आणून व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा उद्देश आहे. अशी माहिती अग्रवाल समाज पुणेचे अध्यक्ष ईश्वरचंद गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अग्रवाल समाज पुणेचे सेक्रेटरी संजय अग्रवाल, कोषाध्यक्ष दीपक बंसल, सहसचिव मुकेश कनोडीया आदि मान्यवर उपस्थित होते. https://maharashtramirror.com/ Pune News

या प्रदर्शनात विविध क्षेत्रांतील व्यावसायिक कंपन्या आणि उद्योजक सहभागी होणार असून, त्यांच्या उत्पादनांचे व सेवांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच प्रमुख व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, व्यावसायिक नेटवर्किंग आणि सामुदायिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील व्यावसायिकांच्या सहभागामुळे नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करण्याची आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात सर्व समाजातील नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी, १६ ऑक्टोबर रोजी उद्घाटन समारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर  ‘लीडरशिप लेगसी’ या विषयावरील चर्चासत्र, महिला नेतृत्व आणि व्यवसायवृद्धी यांवरील सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. त्यानंतर अग्रवाल समाजासाठी दांडिया नाईटचे आयोजन करण्यात येणार आहे.

१७ ऑक्टोबर रोजी ‘महासंगम समिट’, ब्रँडनिर्मिती आणि नफावाढ या विषयावरील विशेष व्याख्यान, ‘व्हिजनरी लीडर्स’ चर्चासत्र तसेच ‘आरोग्य संवाद : हेल्थ फर्स्ट’ हा आरोग्यविषयक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

प्रदर्शनाच्या अंतिम दिवशी, १८ ऑक्टोबर रोजी ‘वॉक ओव्हर कॉफी’, युवकांसाठी विशेष उपक्रम, करिअर समुपदेशन, पुरस्कार वितरण आणि अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा