मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai news : प्रशांत भूषणांच्या "सत्ता परिवर्तना"च्या विधानामुळे सीजेपी अडचणीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस व आंदोलकांवर जोरदार हल्लाबोल

Mumbai news :मुंबई :- ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी देशामध्ये "सत्ता परिवर्तन" (Regime Change) हवे असल्याचे उघडपणे म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

प्रशांत भूषणांच्या "सत्ता परिवर्तना"च्या विधानामुळे सीजेपी अडचणीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस व आंदोलकांवर जोरदार हल्लाबोल
प्रशांत भूषणांच्या "सत्ता परिवर्तना"च्या विधानामुळे सीजेपी अडचणीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस व आंदोलकांवर जोरदार हल्लाबोल

Mumbai news :मुंबई :- ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी देशामध्ये "सत्ता परिवर्तन" (Regime Change) हवे असल्याचे उघडपणे म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या विधानामुळे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विरोधकांचे बिंग फुटले असून, हा सर्व खेळ केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू असल्याचा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आंदोलनांच्या आणि लोकशाहीच्या नावाखाली देशात अराजकता माजवून केंद्र सरकार उलथवून टाकण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

प्रशांत भूषणांच्या विधानामुळे बिंग फुटले; फडणवीसांचे सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया

प्रशांत भूषण यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना, "होय, आम्हाला सत्ता परिवर्तन हवे आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही," असे म्हटले होते. हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, "It’s done bro, everything is exposed!! Afterall, it was all about 'Regime Change'.." अशा शब्दांत निशाणा साधला. अखेर मनात लपलेली खरी गोष्ट ओठांवर आलीच, विद्यार्थ्यां व शेतकऱ्यांना भडकावणे, जाती-भाषेच्या नावावर द्वेष पसरवणे आणि घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलीन करणे हाच यांचा मूळ उद्देश असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही काँग्रेसवर देशामध्ये बांगलादेशच्या धर्तीवर अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

CJP कडून मात्र सारवासारव आमची मागणी फक्त निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची असल्याची स्पष्टोक्ती

वाढत्या वादानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर CJP च्या वतीने तातडीने सारवासारव करण्यात आली आहे. CJP चे नेते अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले की, आमची मागणी कोणत्याही प्रकारच्या सत्ता परिवर्तनाची नसून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आहे. निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर आमचा आक्षेप असून आम्ही केवळ निवडणुकांशी संबंधित मुद्द्यांवर लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी प्रशांत भूषणांच्या विधानामुळे या संपूर्ण आंदोलनाला आता एक नवे आणि राजकीय वळण मिळाले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा