मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Prakash Mahajan : प्रकाश महाजन यांच्या‌ हाती 'धनुष्यबाण' ; ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

• मनसे सोडल्यानंतर 3 महिन्यांनी घेतला मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना धक्का

V
Vivek

1 मिनिट वाचन

Prakash Mahajan : प्रकाश महाजन यांच्या‌ हाती 'धनुष्यबाण' ; ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

• मनसे सोडल्यानंतर 3 महिन्यांनी घेतला मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना धक्का

ठाणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर आपली नवीन राजकीय वाटचाल निश्चित केली आहे. ठाणे येथे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. काल त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली, ज्याला उपमुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे.

13 सप्टेंबरला दिला होता राजीनामा

प्रकाश महाजन यांनी 13 सप्टेंबर रोजी मनसेच्या प्रवक्तेपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेवर नाराज असल्याची चर्चा होती. विशेषतः, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षाची बदलती भूमिका यावरून त्यांचे मतभेद टोकाला पोहोचले होते.राजीनामा दिल्यानंतर तीन महिने त्यांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली होती, मात्र आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिक्कामोर्तब

काल मुंबईत प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि उपमुख्यमंत्री राबवत असलेल्या विकासकामांवर विश्वास दर्शवत शिवसेनेत काम करण्याची तयारी दर्शवली. महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना प्रकाश महाजन यांच्यासारखा अनुभवी आणि आक्रमक नेता सोबत येणे, हा शिंदे गटासाठी मोठा फायदा मानला जात आहे.

मनसेसाठी मोठा धक्का

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि प्रमोद महाजन यांचे बंधू असल्याने प्रकाश महाजन यांचे मनसेमध्ये मोठे वजन होते. विशेषतः मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात त्यांची चांगली पकड आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय मनसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा: Prashant Jagtap : प्रशांत जगतापांचा 'हात' भक्कम! "राजकारण सोडेन पण काँग्रेस सोडणार नाही"; पक्षप्रवेशावेळी भावनिक आवाहन

शेअर करा