मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane News : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राम पूर्णेकरांची ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी भेट; "मी तुझ्या पाठीशी आहे, न्याय मिळवून देणार!" मुख्यमंत्र्यांचा धीर

Thane News :ठाणे :- ठाकरे गटाचे दिवंगत विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या चर्चित हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राम पूर्णेकरांची ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी भेट; "मी तुझ्या पाठीशी आहे, न्याय मिळवून देणार!" मुख्यमंत्र्यांचा धीर
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राम पूर्णेकरांची ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी भेट; "मी तुझ्या पाठीशी आहे, न्याय मिळवून देणार!" मुख्यमंत्र्यांचा धीर

Thane News :ठाण्यातील नवरात्रोत्सवादरम्यान घडली महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड; दोन दिवसांनी पुन्हा स्वतंत्र बैठकीसाठी बोलावले

Thane News :ठाणे :- ठाकरे गटाचे दिवंगत विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या चर्चित हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. न्याय मिळवण्यासाठी आक्रमक झालेले प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी ठाणे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राम पूर्णेकर यांना धीर देत, "तुझ्या वडिलांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, मी आणि माझे सरकार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," असा ठाम शब्द दिला. या उच्चस्तरीय भेटीमुळे ठाणे आणि राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.https://maharashtramirror.com/ Thane News

हायलँड पार्क येथील नवरात्रोत्सवात झाली भेट; मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यातील बाळकूम व हायलँड पार्क परिसरातील विविध सार्वजनिक मंडळांना भेट देण्यासाठी आले होते. याच दरम्यान भाजपचे आमदार संजय केळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत एक निवेदन सादर केले. आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी योग्य तो तपास होऊन कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी आर्त हाक त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर घातली. राम पूर्णेकरांचे म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दोन दिवसांनी पुन्हा सविस्तर चर्चेसाठी बोलावले आहे.

पुरवणी एफआयआर आणि पोलिसांच्या कसून चौकशीमुळे प्रकरण आले ऐरणीवर

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी याआधीच 5 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील पुरवणी एफआयआरमध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे समाविष्ट असून, ठाणे गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांची तब्बल दोन दिवस सखोल व दीर्घ चौकशी केली आहे. स्थानिक पातळीवर या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असतानाच, पूर्णेकर कुटुंबाने थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्यामुळे या प्रकरणाचा तपास आता अधिक निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा