मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Political News : पीएमपीएमएलमधील घोटाळ्याविरोधात मनसे आक्रमक

भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी खास सभेवेळी आंदोलन

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

Political News : पीएमपीएमएलमधील घोटाळ्याविरोधात मनसे आक्रमक

भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी खास सभेवेळी आंदोलन

सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी

पुणे, महाराष्ट्र मिरर Political News : पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपीएमएल) मोठ्या प्रमाणावर सेवाजेष्ठता डावलून पैसे घेऊन नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.२०) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिकेत पीएमपीएमएलच्या खास सभेच्या वेळी आंदोलन करण्यात आले.Political News

पीएमपीएमएलमधील भरती प्रक्रिया रद्द करा आदी मागण्यांसाठी मनसे चे सरचिटणीस हेमंत शंभुस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी पीएमपीएमएलवरील खास सभा चालू असताना, महापालिकेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर ‘गली गली मे शोर है, पीएमपीएमएल चोर है’, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, महापालिका आयुक्त, पीएमपीएमएलचे व्यवस्थपकीय संचालक यांच्या भेटीची मागणी करीत सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिका सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर थोपवून ठेवले. यावेळी मनसेकडून सुमारे पाऊन तास आंदोलन सुरू ठेवले.Political News

महापालिका सुरक्षा यंत्रणा सक्षम करा : महापौर

दरम्यान महापालिकेची सर्व साधारण सभा चालू असताना मनसे आंदोलक महापालिकेत येतात, सभागृहाबाहेर आंदोलक आले आहेत. यापूर्वी ही असे प्रकार चार वेळा घडले आहेत. महापालिकेची सुरक्षा व्यवस्था करते काय असा प्रश्न माजी सभागृह नेते व भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आंदोलन सुरू असताना सभागृहात उपस्थित केला.

हा मुद्दा उचलून विरोधी पक्षांनी याचे भांडवल केले व सभागृहात गोंधळ सुरू केला. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी सुरक्षा व्यवस्था, किती जणांचे स्कॅन होते असे प्रश्न करून महापौर यांनी महापालिका आयुक्त यांनी एका महिन्यात सुरक्षा यंत्रणा सक्षम करावी असे आदेश दिले. तसेच महापालिका मुख्य इमारतीत येणारी प्रवेशद्वारे कमी करावी असेही सांगितले.

Political News

शेअर करा