मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पवना नदीकाठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८०० लिटर रसायन जप्त

२८ हजार ८०० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त; एका महिलेवर गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

पवना नदीकाठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८०० लिटर रसायन जप्त

२८ हजार ८०० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त; एका महिलेवर गुन्हा दाखल

पिंपरी: पुसाणे गावच्या हद्दीत पवना नदीच्या बाजूला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई रविवार (३ मे) रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप राठोड यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत हातभट्टी लावली जात होती. पोलिसांनी छापा टाकला असता तिथे दारू तयार करण्यासाठी लागणारे ८०० लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन आढळून आले. पोलिसांनी २८ हजार ८०० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

शेअर करा