मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : दिवाळीनिमित्त सोमवारी स्थानिक सुट्टी; अपॉइंटमेंट आणि शिबीर दौऱ्यांच्या तारखांमध्ये बदल

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे यांनी सोमवारी (दि.९)स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दिवाळीनिमित्त सोमवारी स्थानिक सुट्टी; अपॉइंटमेंट आणि शिबीर दौऱ्यांच्या तारखांमध्ये बदल
दिवाळीनिमित्त सोमवारी स्थानिक सुट्टी; अपॉइंटमेंट आणि शिबीर दौऱ्यांच्या तारखांमध्ये बदल


Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर -
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे यांनी सोमवारी (दि.९)स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. शुक्रवारी (दि.६) ऐवजी आता सोमवारी (िद.९)ही स्थानिक सुट्टी असेल. या सुट्टीच्या निर्णयामुळे आरटीओच्या नियमित कामकाजात, ड्रायव्हिंग लायसन्स अपॉइंटमेंट आणि ग्रामीण शिबीर दौऱ्यांच्या तारखांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अपॉइंटमेंट घेतलेल्या अर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी ‘सारथी’ व ‘वाहन’ प्रणालीवरून ज्या अर्जदारांनी अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) यासाठी सोमवारी (दि.९) पूर्वनियोजीत वेळ (अपाॅइंटमेंट) घेतली होती, त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कालावधी: आयडीटीआर, आळंदी रोड व दिवे कार्यालयासाठी अपाॅइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना आता १२ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कोणत्याही कार्यालयीन दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज सादर करता येतील. या अर्जदारांची ९ नोव्हेंबरचीच जुनी अपाॅइंटमेंट पूर्णपणे ग्राह्य धरली जाणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ग्रामीण शिबीर दौऱ्यांच्या तारखांमध्ये फेरबदल

आरटीओच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामीण शिबीर दौऱ्यांच्या वेळापत्रकातही खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे: वेल्हा शिबीर दौरा: ३ नोव्हेंबर रोजी होणारा वेल्हा शिबीर दौरा आता २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित केला जाईल. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी सर्व संबंधित नागरिकांना आणि अर्जदारांना या सुट्टीची व बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा