Pune crime: पीएमपीएमएल बसमध्ये ज्येष्ठ प्रवाशाचे दागिने चोरीला
Pune crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेत ६६ वर्षीय प्रवाशाच्या बॅगेतून २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले.
1 मिनिट वाचन

Pune crime : हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
Pune crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेत ६६ वर्षीय प्रवाशाच्या बॅगेतून २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. निगडी ते भेकराईनगर मार्गावरील ई-९० बसमधून आकुर्डी ते हडपसर प्रवासादरम्यान ही चोरी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चिखलीतील साने चौक परिसरात राहतात. १२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी बाराच्या दरम्यान ते निगडी-भेकराईनगर मार्गावरील पीएमपीएमएलच्या ई-९० बसने प्रवास करीत होते.
आकुर्डी ते हडपसर प्रवासादरम्यान बसमध्ये गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या जवळील बॅगेत ठेवलेले २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांच्या नकळत चोरून नेले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नसून पोलिस अंमलदार डी. ए. कांबळे पुढील तपास करीत आहेत.




