मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PMC Sewa Wari : महापौरांच्या 'सेवा वारी' दाव्याला पालिकेच्या शाळेकडून हरताळ

PMC Sewa Wari : एकीकडे पुणे महानगरपालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यानिमित्त शहरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी 'सेवा वारी' ही भव्य आणि संवेदनशील संकल्पना राबविण्याचा गाजावाजा केला जात असतानाच, दुसरीकडे महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांची असंवेदनशीलता आणि ढिसाळ नियोजनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

DO
Dhanshree Otari

2 मिनिट वाचन

PMC Sewa Wari

PMC Sewa Wari : वारकऱ्यांचे साहित्य बाहेर काढून शाळेला ठोकले कुलूप तर पेठांमध्ये वारकऱ्यांचे पाण्यासाठी हाल

PMC Sewa Wari : एकीकडे पुणे महानगरपालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यानिमित्त शहरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी 'सेवा वारी' ही भव्य आणि संवेदनशील संकल्पना राबविण्याचा गाजावाजा केला जात असतानाच, दुसरीकडे महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांची असंवेदनशीलता आणि ढिसाळ नियोजनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोरपडे पेठेतील महर्षी आण्णासाहेब शिंदे शाळेत मुक्कामास असलेल्या वारकऱ्यांचे साहित्य शाळेतून बाहेर काढून खोलीला कुलूप लावण्यात आले, तर दुसरीकडे मध्यभागातील पेठांमध्ये लाखो वारकऱ्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या. PMC Sewa Wari controversy Warkari School 

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या गुरुवारी रात्री पुण्यात विसावल्या आहेत. त्यांच्यासोबत माऊलींच्या भेटीची आस लागलेले लाखो वारकरीही शहराच्या विविध भागात मुक्कामासाठी थांबले आहेत. वारकऱ्यांना पाण्याचा तुटवडा भासू देणार नाही, अशी मोठी वाल्गना पुणे महापालिकेने केली होती.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

मात्र, आज (ता. १०) सकाळी वारकरी अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेले असता शाळा, मंगलकार्यालये आणि महापालिकेने तयार केलेल्या पानवठ्यांवर पाणीच उपलब्ध नसल्याचे समोर आले. नाना पेठ, भवानी पेठ आणि गुरुवार पेठ या भागात पाणीटंचाईचे तीव्र सावट होते. काही ठिकाणी पाणी आले, तरी त्याला दाब नसल्याने अतिशय बारीक धार होती. त्यामुळे संतप्त वारकऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांकडे धाव घेतली. PMC Sewa Wari

Amol kolhe : ४८ तासांनंतरही खासदार कोल्हे घटनास्थळापासून दूरच

अधिकाऱ्यांची 'सकाळची' अनास्था आणि अजब दावे
पाणी नसल्याने कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र नेहमीप्रमाणे काही अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळी फोन उचलण्याचे टाळले. काही वेळाने जेव्हा संपर्क झाला, तेव्हा अधिकाऱ्यांनी शहरात पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा छातीठोक दावा केला. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करताच प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर जलवाहिनीमध्ये हवा अडकून राहिल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे अजब कारण प्रशासनाने पुढे केले. PMC Sewa Wari

Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण ?

साहित्य उघड्यावर, शाळेला ठोकले कुलूप


पाणीटंचाईच्या या गोंधळातच घोरपडे पेठेतील महर्षी आण्णासाहेब शिंदे शाळेत एक संतापजनक प्रकार घडला. येथे मुक्कामी असलेले वारकरी बाहेर गेले असताना महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने त्यांचे सर्व साहित्य खोलीबाहेर काढून उघड्यावर टाकले. एवढेच नव्हे तर वारकरी परतण्यापूर्वीच खोलीला कुलूप ठोकून तो कर्मचारी तेथून निघून गेला. दूरवरून पायी आलेल्या वारकऱ्यांना जेव्हा आपले साहित्य उघड्यावर दिसले आणि खोलीला कुलूप आढळले, तेव्हा त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. PMC Sewa Wari

Warakari Death : वारकऱ्याचा चेंगराचेंगरीने नव्हे, तर हृदयविकाराने मृत्यू; पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण

'सेवा वारी'चा केवळ देखावा?
वारकऱ्यांची सुरक्षितता, स्वच्छता आणि आरोग्य या तीन गोष्टींवर आधारित महापालिकेकडून यंदाची वारी ‘सेवा वारी’ म्हणून साजरी होणार असल्याचे सांगत सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले दोन दिवसांपूर्वी केले होते मात्र, पाणीपुरवठ्याचे तीन तेरा वाजणे आणि वारकऱ्यांचे साहित्य बाहेर फेकले जाणे, या प्रकारांमुळे महापालिकेच्या दाव्यांमधील फोलपणा उघड झाला आहे.

"एकीकडे स्वागताचे मोठे फलक लावायचे आणि दुसरीकडे माऊलींच्या भक्तांना पाण्यासाठी व निवासासाठी असा त्रास द्यायचा, हा महापालिकेचा दुटप्पीपणा आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या संपूर्ण ढिसाळ कारभाराची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा