मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PMC News : येरवडा हॉटमिक्स प्लांटसाठी चौदा कोटींच्या साहित्य खरेदीला मान्यता

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : पुणे महापालिकेच्या येरवडा येथील हॉटमिक्स प्लांटचे कामकाज अखंडित सुरू ठेवण्यासाठी डांबर, एलडीओ, इमल्शन, रोडबॉन्ड (कोल्डमिक्स) आणि थर्मिक ऑइल अशा पेट्रोलियमजन्य साहित्याच्या सुमारे १४ कोटी रुपयांच्या खरेदीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता.

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

PMC News : येरवडा हॉटमिक्स प्लांटसाठी चौदा कोटींच्या साहित्य खरेदीला मान्यता

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : पुणे महापालिकेच्या येरवडा येथील हॉटमिक्स प्लांटचे कामकाज अखंडित सुरू ठेवण्यासाठी डांबर, एलडीओ, इमल्शन, रोडबॉन्ड (कोल्डमिक्स) आणि थर्मिक ऑइल अशा पेट्रोलियमजन्य साहित्याच्या सुमारे १४ कोटी रुपयांच्या खरेदीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.PMC News

येरवडा येथील महापालिकेचा बॅच मिक्स (हॉटमिक्स) प्लांट शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालये तसेच मुख्य पथ विभागाला दररोज डांबरी मिश्रणाचा पुरवठा करतो. या मिश्रणाचा वापर पावसाळ्यातील खड्डे बुजविणे, रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती आणि पुनर्डांबरीकरणासाठी केला जातो. वर्षभर दोन शिफ्टमध्ये प्लांट कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक साहित्याचा सातत्याने पुरवठा आवश्यक असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.PMC News

प्रशासनाने यापूर्वीही २०२३ मध्ये सुमारे १४.२९ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, २७ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या स्थायी समितीच्या ठरावानुसार अधिनियमातील विशेष तरतुदीचा वापर करून उत्पादक कंपन्यांकडून थेट खरेदी करण्यास आयुक्तांना अधिकार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर यंदाही पुढील दोन महिन्यांसाठी आवश्यक साहित्य थेट खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.PMC News

प्रस्तावानुसार डांबर (व्हीजी-३० ग्रेड), एलडीओ आणि थर्मिक ऑइल हे साहित्य हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून, तर इमल्शन (आरएस-१, आरएस-२) आणि रोडबॉन्ड (कोल्डमिक्स) हिंदुस्थान कोलास प्रा. लि.कडून खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदीसाठी कोणतीही अनामत रक्कम किंवा स्वतंत्र करारनामा करण्यात येणार नसल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात विशेष कार्याधिकारी (पथ) या अर्थशीर्षाखाली १३.९९ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असून, त्यातून पुढील दोन महिन्यांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

नवीन प्लांट कार्यान्वित करणार

येरवडा हॉटमिक्स प्लांटमध्ये पार्कर कंपनीचा नवीन बॅच मिक्स प्लांट कार्यान्वित करण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक थर्मिक ऑइलचीही प्रथमच खरेदी करण्यात येणार आहे. प्लांटमधील डांबरी मिश्रण आवश्यक तापमानात ठेवण्यासाठी आणि यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी थर्मिक ऑइल आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.PMC News

PMC News

शेअर करा