मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PMC: मंजूर १३ पैकी ८ पदे रिक्त; पुण्याच्या शासकीय बालरुग्णालयांची अवस्था रामभरोसे

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

1 मिनिट वाचन

PMC

PMC: पुणे महापालिका रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ञांची तीव्र कमतरता

पुणे, महाराष्ट्र मिरर

PMC: पालिकेच्या रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ञांची एकूण १३ पदे मंजूर असताना, त्यापैकी प्रत्यक्षात केवळ ५ पदे भरली गेली असून तब्बल ८ पदे अद्यापही रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात बालरोगतज्ञांच्या गंभीर अभावामुळे नवजात आणि बाल आरोग्य सेवांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. pmc hospital child specialist shortage pune

विशेष वैद्यकीय सेवेची आवश्यकता असलेल्या नवजात बालकांवर, विशेषतः अपरिपक्व बाळे, कमी वजनाची बाळे, श्वसनाचा त्रास आणि गंभीर संसर्ग असलेल्यांवर उपचार करण्यात बालरोगतज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि, अनेक महापालिका रुग्णालयांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या तज्ञांची संख्या मर्यादित असल्याने, सध्याच्या डॉक्टरांवरील कामाचा ताण लक्षणीयरीत्या वाढला आहे. PMC

Rain Update: खडकवासला धरणसाखळीत ८७ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; मुठा नदीतील विसर्ग बंद

जीवघेण्या संसर्गाशी लढणाऱ्या नवजात शिशूंसाठी 'एनआयसीयू'मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे २४ तास असणे बंधनकारक असते. मात्र, मोजक्याच डॉक्टरांवर संपूर्ण शहराचा ताण ढकलून पालिका प्रशासन काय साधत आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कागदोपत्री आरोग्य सुविधांचे गोडवे गाणाऱ्या प्रशासनाला या गंभीर समस्येचे गांभीर्य अद्यापही आलेले नाही, हेच यावरून स्पष्ट होते. PMC

गरिब आणि सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांचे अवाच्या सवा बिल परवडत नसल्याने ते नाइिलाजास्तव महापालिकेच्या रुग्णालयांचा आधार घेतात. परंतु, पालिकेच्या रुग्णालयांत डॉक्टरच उपलब्ध नसतील, तर उपचारासाठी अगतिक झालेल्या पालकांना नाइिलाजाने खासगी दवाखान्यांची पायरी झिजवाव्या लागत असल्याचे काही स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.

Pune Police: जखमी तक्रारदारांना आता स्वतः रुग्णालयात नेणार पोलीस

रिक्त पदांचा हा प्रश्न नवीन नाही; याआधीही अनेकदा उघडकीस आला आहे. तरीही महापालिका आयुक्त व आरोग्य विभाग ठोस पावले उचलण्यास टाळाटाळ करत आहेत. जर लवकरात लवकर बालरोगतज्ञांची पूर्ण भरती केली नाही, तर तीव्र जनक्षोभ लोटेल आणि उद्भवणाऱ्या बालमृत्यूंच्या सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, असा संतप्त इशारा आता आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror News English (@maharashtramirror_english_news)

शेअर करा