PMC : ‘पुष्पा’ फेम वृक्ष अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; ५ लाखांची लाचखोरी अन्
पुणे, महाराष्ट्र मिरर
3 मिनिट वाचन

PMC : पु. एल. देशपांडे बागेतून रात्रीच्या वेळी लाकूड चोरी तर वानवडीत अनधिकृत झाडे काढण्यासाठी ५ लाखांची मागणी
पुणे, महाराष्ट्र मिरर
PMC : पुणे महानगरपालिकेच्या वर्तुळात सध्या वृक्षतोड, लाकूड चोरी आणि लाचखोरीचा एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील प्रसिद्ध पु.ल. देशपांडे उद्यानातून (संभाजी पार्क / गारगोटी उद्यान) बेकायदेशीरपणे झाडे तोडून त्याचे लाकूड चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पार्वती पोलीस ठाण्यात मनपा कर्मचारी आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पालिकेने कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले आहे. परंतु, या प्रकरणाचे धागेदोरे केवळ एका चोरीपुरते मर्यादित नसून, याच मनपा कर्मचाऱ्याचे नाव यापूर्वी वानवडी परिसरातील एका हायप्रोफाईल लाचखोरीच्या प्रकरणातही समोर आल्याने पालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. -pmc horticulture employee bribe case tree
PMC News : येरवडा हॉटमिक्स प्लांटसाठी चौदा कोटींच्या साहित्य खरेदीला मान्यता
वानवडीतील लाचखोरीचे प्रकरण चव्हाट्यावर
या संपूर्ण घटनेनंतर आता विकास अटोले यांच्या इतर बेकायदेशीर कारभारांचीही पोलखोल झाली आहे. पुणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण सदस्य तथा 'शिवसाई संस्था (ट्रस्ट)'चे संस्थापक अध्यक्ष जयदीप पडवळ यांनी १८ जून २०२६ रोजी वृक्ष अधिकारी तथा सहायक आयुक्त, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडे एक अतिशय गंभीर लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, वानवडी परिसरातील क्लोव्हर हिल प्लाझाजवळ, डोराबजी पॅराडाईज आणि एनआयबीएम (NIBM) रोडवरील एका वादग्रस्त जागेवर विकासकाने कोणतीही 'गार्डन प्रोजेक्शन एनओसी' न घेता जेसीबीच्या सहाय्याने तीन मोठी झाडे बेकायदेशीरपणे मुळापासून उपटून काढली होती आणि इतर झाडे देखील धोक्यात आणली होती.

स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी हॉर्टिकल्चर मिस्त्री विकास अटोले यांना बोलावून घटनास्थळी पाहणी करण्यास सांगितली. परंतु, आरोपानुसार विकास अटोले यांनी जागेवर येऊन कारवाई करण्याऐवजी, संपूर्ण झाडे पूर्णपणे काढून देण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी तब्बल पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. "मी ही सर्व झाडे काढून देतो," असे सांगत त्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी वेळीच ताकद लावून हा डाव उधळून लावला नसता, तर त्या ठिकाणी आणखी मोठी वृक्षतोड झाली असती.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, एवढी गंभीर लेखी तक्रार आणि व्हिडिओ पुरावे उपलब्ध असतानाही संबंधित लाचखोर कर्मचाऱ्यावर तात्काळ कठोर निलंबन किंवा बडतर्फेची कारवाई न झाल्यामुळे अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुणे महानगरपालिकेच्या वर्तुळात अशा अधिकाऱ्यांवर वरदहस्त असल्यामुळेच चोऱ्या आणि लाचखोरीचे प्रमाण वाढत आहे, असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
महापालिकेकडून कंत्राटदार काळ्या यादीत
दोन दिवसापूर्वी म्हणजेच, २८ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सिंहगड रोडवरील पी. एल. देशपांडे बागेतून एक टेम्पो लाकूड भरून बाहेर पडत होता. या संशयास्पद हालचालींवर सतर्क नागरिक तन्मय बाबर यांची नजर पडली. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या एका गस्ती पथकाने तात्काळ कारवाई करत तो टेम्पो अडवला आणि त्यातील इसमांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान उघड झाले की, बागेतील झाडे परस्पर तोडून त्याचे लाकूड कोंढवा येथील एका गोदामात बेकायदेशीरपणे नेले जात होते. pmc

पोलीस तपासात पुढे आले की, बागेतील हे लाकूड आणि वृक्षतोड सिंहगड रोड परिसराचे बाग पर्यवेक्षक (हॉर्टिकल्चर मिस्त्री) विकास नानासाहेब अटोले यांच्या निर्देशानुसार सुरू होती. आरोपी तुकाराम कुंडगीर याने पोलिसांसमोर हा खुलासा केला. सुरुवातीला विकास अटोले यांनी झाडे तोडण्याची कोणतीही परवानगी दिली असल्याचे साफ नाकारले होते. मात्र, नंतरच्या चौकशीत आणि ऑडिओ-व्हिडिओ संभाषणांमध्ये त्यांनी कामगारांना झाडे तोडण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पार्वती पोलिसांनी विकास अटोले, तुकाराम कुंडगीर आणि इतर तिघांवविरोधात गुन्हा दाखल केला असून पालिकेने तातडीने कठोर पावले उचलत संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले आहे आणि बागेतील सुरक्षा रक्षकालाही बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत. pmc
https://www.instagram.com/reel/DbafYwAtCkD/?igsh=MTF0dzJsOGt5M3ZxYQ==




