मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pimpari Crime : नागरिकांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून 'म्युल खाती' उघडणारे भामटे जाळ्यात

Pimpari crime : पिंपरी: विदेशी शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल ८३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

नागरिकांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून 'म्युल खाती' उघडणारे भामटे जाळ्यात
नागरिकांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून 'म्युल खाती' उघडणारे भामटे जाळ्यात

Pimpari crime : गोवा आणि कोलकात्यातून दोघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून अटक

Pimpari crime : पिंपरी: विदेशी शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल ८३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सामान्य नागरिकांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांची म्युल बँक खाती गोळा करणे आणि त्यावर सायबर फसवणुकीतील करोडो रुपये स्वीकारणे असा प्रकार करणाऱ्या गोवा आणि कोलकात्यातील दोन भामट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.https://maharashtramirror.com/ pimpari crime

काय आहे मूळ प्रकरण?


एका खाजगी कंपनीतील मॅनेजर असलेल्या फिर्यादीस परदेशी शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट तसेच आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास ५०० टक्के परतावा (नफा) देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. आरोपींनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने एकूण ८३,८०,००० रुपये उकळून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.https://maharashtramirror.com/ pimpari crime

बँक खात्याच्या तपासातून लागला धागाधोरा


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तपासाला सुरुवात झाली. सखोल आर्थिक व तांत्रिक विश्लेषणादरम्यान, २१ मार्च २०२६ रोजी फिर्यादीच्या खात्यातून ३० लाख रुपयांची रक्कम 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया' येथील 'शिवशक्ती एंटरप्रायझेस' नावाच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. हे खाते गोवा येथील अभिकेष मोहन आचरेकर आणि प्रतीक्षा नाईक यांच्या भागीदारीत होते. https://maharashtramirror.com/ pimpari crime

खेड शिवापूर येथून पहिली अटक


आरोपी अभिकेष आचरेकर हा सातत्याने आपले ठिकाण बदलत होता. २८ ऑगस्ट २०२६ रोजी तो पुण्यात आल्याची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांच्या पथकाने खेड शिवापूर टोलनाक्याजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सेंट्रल बँकेतील खात्याचा वापर सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी केल्याची कबुली दिली.https://maharashtramirror.com/ pimpari crime

कर्जाचे आमिष दाखवून ६० ते ७० म्युल खाती उघडली


तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी अभिकेष आचरेकर हा गोव्यातील सामान्य नागरिकांना, विशेषतः महिलांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावे ६० ते ७० बँक खाती (म्युल खाती) उघडत असे. ही खाती तो कोलकाता येथील त्याचा साथीदार अनमोल शर्मा याला पाठवत असे. या खात्यांमधून सायबर फसवणुकीचे करोडो रुपये ट्रान्सफर केले जात होते. तसेच हे आरोपी पुणे शहर व राजस्थान येथील गुन्ह्यांतही हवे असलेले आरोपी असल्याचे समोर आले आहे.

कोलकात्यात जाऊन दुसऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या


मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक तातडीने कोलकात्याला रवाना झाले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनमोल शर्मा (वय ३२, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली. त्यानेही म्युल खात्यांचा वापर करून सायबर गुन्ह्यांतील पैसे घेतल्याची कबुली दिली आहे.

तपास पथक


ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोनि दिगंबर गायकवाड, सपोनि प्रवीण स्वामी, सपोनि वैभव पाटील, पोउपनि प्रकाश कातकाडे, पोउपनि सागर पोमण, रोहित डोळस, विद्या पाटील आणि सायबर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.

शेअर करा