मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Peregrine | खराडीतील पेरेग्रीन कंपनी विरोधात राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटना आक्रमक

सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी व थकीत पगाराचा मुद्दा ऐरणीवर

M
mubarak

1 मिनिट वाचन

peregrine protest

  • सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी व थकीत पगाराचा मुद्दा ऐरणीवर
  • पुणे, दि. ८ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Peregrine

    खराडी येथील (Peregrine Guarding Pvt Ltd ) पेरेग्रीन कंपनीतील सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी व थकीत पगाराच्या मुद्यावरून राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटना आक्रमक झाली आहे. आज दि. ८ रोजी खराडी येथे कंपनीविरोधात निषेधात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला.

    Peregrine Guarding Pvt Ltd कंपनीच्यावतीने कल्पतरू ट्रान्समिशन लि. येथे सुरक्षा रक्षक काम करत असताना एका वर्षाचा भविष्य निर्वाह निधी व थकीत पगाराच्या मुद्यावरून राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटनेचे अध्यक्ष शशांक तिकोणे यांच्या नेत्तृत्वाखाली सुरक्षा रक्षकानी कंपनी विरोधात आदोंलनाचा पावित्रा घेतला आहे.

    मनसे कामगार सेनेचे नरेंद्र तांबोळी व राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटनेचे अध्यक्ष शशांक तिकोणे यांनी पेरेग्रीन कंपनी प्रशासनासमोर सुरक्षा रक्षकांच्या समस्या ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु कंपनी व्यवस्थापनाकडून चर्चेसाठी टाळाटाळ करण्यात आली. आंदोलन दाबून टाकण्यासाठी पोलिसांना बोलविण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटना (संलग्न महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना) अध्यक्ष शशांक तिकोणे, योगेश खडके, अमोल सावर्गावकर, अच्युतराव मुळावडे, अनिता पाटील उपस्थित होते.

    महाराष्ट्र मिररकडून याविषयी कंपनी अधिकाऱ्यांना माहिती विचारण्यात आली असता माहिती देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली.

    हेही वाचा: Pune Crime News | नागालँन्डच्या विद्यार्थ्यांची सुस-पाषाण टेकडीवर लूटमार करणाऱ्या आरोपींना बेड्या

    शेअर करा