मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PCMC News : …अन्यथा डेपात कचरा येऊ देणार नाही

पिंपरी, महाराष्ट्र मिरर PCMC News : मोशी कचरा डेपोला पर्याय शोधावा आणि पुनावळे येथील आरक्षण विकसित करण्यात यावे, अशी मागणी मोशी ग्रामस्थांनी केली.

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

PCMC News : …अन्यथा डेपात कचरा येऊ देणार नाही

मोशी ग्रामस्थांचा पिंपरी -चिंचवड मनपा प्रशासनाला तीन महिन्यांचा अल्टिमेटम

पिंपरी, महाराष्ट्र मिरर PCMC News : मोशी कचरा डेपोला पर्याय शोधावा आणि पुनावळे येथील आरक्षण विकसित करण्यात यावे, अशी मागणी मोशी ग्रामस्थांनी केली. प्रशासनाने यासाठी तीन महिन्यांत पर्याय शोधण्याचे आश्वासन दिले. मात्र, या कालावधीत ठोस निर्णय झाला नाही, तर मोशी कचरा डेपोमध्ये शहरातील कचरा येऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.PCMC News

मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतर मोशी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सोमवारी पिंपरी -चिंचवड महापालिका भवनात महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

बैठकीत ग्रामस्थांनी दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा मांडला. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी आणि कचरा डेपोमुळे होत असलेल्या आरोग्य आणि पर्यावरणीय दुष्परिणामांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. याशिवाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक प्रश्नांवरही प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.PCMC News

ही घटना केवळ एका अपघातापुरती मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षितता, पर्यावरण आणि प्रशासनावरील विश्वासाशी संबंधित अत्यंत गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. मोशीकरांच्या न्याय्य मागण्यांवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसून, प्रशासनाने या प्रश्नांकडे सर्वोच्च प्राधान्याने लक्ष देऊन निर्धारित तीन महिन्यांच्या कालावधीत ठोस पर्याय आणि कार्यवाही सादर करावी, अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

बैठकीस स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, प्रभाग अध्यक्षा अर्चना सस्ते, नगरसेविका सारिका गायकवाड, सारिका बोऱ्हाडे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, मंदा आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते राजेश सस्ते, उदय गायकवाड, नीलेश बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे तसेच मोशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

PCMC News

शेअर करा