मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PCMC NEWS : चिखली-कुदळवाडीत पाच अतिक्रमणातील धार्मिक स्थळे पाडली

नागरिकांकडून दगडफेक, अनेक पोलिस जखमी; पहाटेची कारवाई

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

PCMC NEWS : चिखली-कुदळवाडीत पाच अतिक्रमणातील धार्मिक स्थळे पाडली

नागरिकांकडून दगडफेक, अनेक पोलिस जखमी; पहाटेची कारवाई

एकाच समाजाशी संबंधित पाच धार्मिक स्थळे पाडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण

पिंपरी PCMC NEWS: पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंगळवारी पहाटे चिखली-कुदळवाडी परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. मात्र, या कारवाई दरम्यान एकाच समाजाशी संबंधित पाच धार्मिक स्थळे पाडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नागरिकांना पोलीस वाहनावर दगडफेक केली. तसेच पोलीस पथकावर दगड फेकले ज्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

नागरिकांची प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी
कारवाईपूर्वी स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांना निवेदन सादर करून अतिक्रमण हटविताना पारदर्शकता राखावी तसेच कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. तथापि, निवेदन दिल्यानंतर अवघ्या काही तासांत पहाटेच्या सुमारास कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.PCMC NEWS

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील सर्व अतिक्रमणांवर समान निकषांनुसार कारवाई होणे अपेक्षित असताना निवडक बांधकामांवरच हातोडा चालविण्यात आला. त्यामुळे संबंधित कारवाईबाबत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

याप्रकरणी नागरिकांनी पुढील कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याचा इशारा दिला असून, सर्व अतिक्रमणांवर एकसमान धोरण राबविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.PCMC NEWS

प्रशासनाची बाजू स्पष्ट होणे अपेक्षित
दरम्यान, विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असला तरी या आरोपांबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या कारवाई मागील नेमकी कारणे आणि प्रशासनाची बाजू स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

PCMC NEWS

शेअर करा