मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PCMC Election : पिंपरी-चिंचवड निवडणुकीपूर्वी पोलिसांचा 'क्लीन स्वीप'! 35 सराईत गुंड तडीपार; राजकारणाशी संबंधित व्यक्तीही रडारवर

Pune Police On Municipal Election : 'अत्यंत संवेदनशील' केंद्रांवर सीसीटीव्ही आणि अतिरिक्त बंदोबस्त; 159 गुन्हेगारांची यादी तयार

V
Vivek

1 मिनिट वाचन

PCMC Election : पिंपरी-चिंचवड निवडणुकीपूर्वी पोलिसांचा 'क्लीन स्वीप'! 35 सराईत गुंड तडीपार; राजकारणाशी संबंधित व्यक्तीही रडारवर

Pune Police On Municipal Election : 'अत्यंत संवेदनशील' केंद्रांवर सीसीटीव्ही आणि अतिरिक्त बंदोबस्त; 159 गुन्हेगारांची यादी तयार

पिंपरी-चिंचवड | आगामी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा राडा किंवा अडथळा येऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. नोव्हेंबर महिन्यात गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या एकूण 35 सराईत गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या या कारवाईत काही राजकारणाशी संबंध असलेल्या 'वजनदार' व्यक्तींचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कुणावर झाली तडीपारीची कारवाई?

पोलिसांनी गुन्ह्यांच्या तीव्रतेनुसार तडीपारीचे वर्गीकरण केले आहे:

दोन वर्षांसाठी तडीपार
निगडीतील आयुब खान, विशाल खरात, थेरगावचा रोहन वाघमारे, वाकडचे ऋतिक व गौरव ढसाळ, भोसरीतील अशोक गोंधने यांसह 20 गुंडांना दोन वर्षांसाठी शहराबाहेर काढले आहे.

एक वर्षासाठी तडीपार:

पिंपरीतील शुभम गायकवाड, पिंपळे गुरवचा शुभम नावळे आणि भोसरी एमआयडीसीतील परशुराम ढेपे यांसह 10 जणांवर एका वर्षाची कारवाई झाली आहे.

सहा महिन्यांसाठी तडीपार:
रावेतचा गंगाधर नाटेकर आणि चाकणचा राजकुमार बिंद यांसह 5 जणांना सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.

राजकीय नेत्यांवर पोलिसांची 'वॉच'

निवडणुकीच्या काळात वातावरण बिघडू नये, म्हणून पोलिसांनी 159 महत्त्वाच्या व्यक्तींची यादी तयार केली आहे. यामध्ये अशा काही नेत्यांचा समावेश आहे ज्यांचा पूर्वीच्या वादात सहभाग होता किंवा ज्यांच्या समर्थकांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. स्थानिक प्रभाव आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईची टांगती तलवार आहे.

शेअर करा