मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pankaja Munde : ओबीसी आरक्षण संपणार या निराशेने शेतकऱ्याची आत्महत्या; पंकजा मुंडे यांनी घेतली कुटुंबीयांची भेट

•नातवाला नोकरी मिळणार नाही या चिंतेतून निवृत्ती यादव यांनी जीवन संपवले; हैदराबाद गॅझेटमुळे भीतीचे वातावरण

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pankaja Munde : ओबीसी आरक्षण संपणार या निराशेने शेतकऱ्याची आत्महत्या; पंकजा मुंडे यांनी घेतली कुटुंबीयांची भेट

•नातवाला नोकरी मिळणार नाही या चिंतेतून निवृत्ती यादव यांनी जीवन संपवले; हैदराबाद गॅझेटमुळे भीतीचे वातावरण

बीड :- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या आणि ‘हैदराबाद गॅझेट’च्या मुद्द्यावरून ओबीसी समाजात निर्माण झालेल्या भीतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील शेतकरी निवृत्ती यादव यांनी याच नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपवल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी यादव कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला.

निवृत्ती यादव यांना आपल्या नातवाच्या नोकरीची चिंता सतावत होती. गावात होणाऱ्या चर्चांमधून ओबीसी आरक्षण संपल्यामुळे त्याला नोकरी मिळणार नाही, या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. यापूर्वी वांगदरी येथील भरत कराड यांनीही याच मागणीसाठी नदीपात्रात उडी मारून जीवन संपवले होते. पंकजा मुंडे यांनी या दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

‘माझी हात जोडून विनंती आहे, कोणीही कच खाऊ नका; तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही’, पंकजा मुंडेंचे आवाहन

या दुर्दैवी घटनांवर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे यांनी भावूक आवाहन केले. "आज माझ्या मतदारसंघात अशा घटना घडल्यामुळे मी इथं आले आहे. माझ्या दोन्ही कुटुंबांना माझी हात जोडून विनंती आहे, कोणीही कच खाऊ नका. या गोष्टी करणाऱ्यांना सोडून द्या आणि संघर्षासाठी तयार राहा," असे त्या म्हणाल्या.

"असे चुकीचे पाऊल उचलू नका, आपला जीव देऊ नका. आपल्या मागे आपला परिवार असतो आणि त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. काहीही कुणाला अडचण येणार नाही, कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशाच प्रकारचे निर्णय होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे," असे सांगत मुंडे यांनी ओबीसी समाजाला धीर देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Sharad Pawar : जयंत पाटलांवरील आक्षेपार्ह टीकेमुळे राष्ट्रवादीत प्रचंड नाराजी; पवारांनी व्यक्त केला संताप

शेअर करा