मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar : जयंत पाटलांवरील आक्षेपार्ह टीकेमुळे राष्ट्रवादीत प्रचंड नाराजी; पवारांनी व्यक्त केला संताप

‘पडळकरांच्या टीकेवरुन शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; ‘अशा वाचाळवीरांना आवरा’, पवारांनी फडणवीसांना खडसावले

V
Vivek

1 मिनिट वाचन

NCP Sharad Pawar: Pawar's shout on NCP's anniversary: ​​'Opportunity for new leadership'!

‘पडळकरांच्या टीकेवरुन शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; ‘अशा वाचाळवीरांना आवरा’, पवारांनी फडणवीसांना खडसावले

मुंबई :- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पडळकरांच्या या बेताल वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे. या प्रकारानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादात थेट हस्तक्षेप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी फोनवर फडणवीसांना सांगितले की, "अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा."

गोपीचंद पडळकर यांनी जत येथील एका कार्यक्रमात जयंत पाटील यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. “जयंत पाटील हा गोपीचंद पडळकरसारखा भिकाऱ्याची औलाद नाही,” असे आक्षेपार्ह विधान करत त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचाही उल्लेख केला होता. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा आक्रोश आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, असे म्हणत फडणवीसांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी या वाचाळवीरांवर काहीतरी ठोस कारवाई करण्याची मागणी केल्याचे समजते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Hingoli News : वसमत तालुक्यातील भेंडेगावात तणाव; शांतता राखण्यासाठी पोलिसांचा‌ फौजफाटा

शेअर करा