मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Old Mumbai Pune Express Accident : भरधाव वाहनाची झाडाला धडक ; १ ठार २ जखमी

पनवेल : पनवेल जवळील जुना पुणे-मुंबई महामार्गावर Old Mumbai Pune Express Accident मुंबईकडे जाणार्‍या लेनवर ठोंबरेवाडी गावाजवळ आज सकाळी भरधाव मारुती सुझुकी सेलेरिओ गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जावून गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात गाडी चालकाचा गंभीररित्या ज

V
Vivek

1 मिनिट वाचन

Old Mumbai Pune Express Accident: Speeding vehicle hits a tree; 1 killed 2 injured

पनवेल : पनवेल जवळील जुना पुणे-मुंबई महामार्गावर Old Mumbai Pune Express Accident मुंबईकडे जाणार्‍या लेनवर ठोंबरेवाडी गावाजवळ आज सकाळी भरधाव मारुती सुझुकी सेलेरिओ गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जावून गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात गाडी चालकाचा गंभीररित्या जखमी होवून मृत्यू झाला आहे. तर गाडीतील दोघेजण जखमी झाले आहेत. Panvel Old Mumbai Pune Express Accident

गाडी चालक विजय पवार (४९ रा.कराड) हे त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी सेलेरिओ गाडी क्रं.एमएच-४६-बीएफ-९५७८ ही गाडी घेवून लोणावळा ते पनवेल असा प्रवास करीत असताना शेडुंग टोल नाका ठोंबरेवाडी येथे त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून रस्त्यावर असलेल्या झाडावर जावून गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात ते स्वतः गंभीररित्या जखमी होवून मयत झाले आहेत. तर गाडीतील प्रवासी भिकाजी गायकवाड (५८) व संगीता गायकवाड (७४) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. Panvel Old Mumbai Pune Express Accident

हेही वाचा: Pooja Khedkar Case Update : पूजा खेडकरवर UPSC ची मोठी कारवाई, ती आता IAS अधिकारी होणार नाही, परीक्षा देण्यावरही बंदी

शेअर करा