Old Mumbai Pune Express Accident : भरधाव वाहनाची झाडाला धडक ; १ ठार २ जखमी
पनवेल : पनवेल जवळील जुना पुणे-मुंबई महामार्गावर Old Mumbai Pune Express Accident मुंबईकडे जाणार्या लेनवर ठोंबरेवाडी गावाजवळ आज सकाळी भरधाव मारुती सुझुकी सेलेरिओ गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जावून गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात गाडी चालकाचा गंभीररित्या ज
1 મિનિટ વાંચન

पनवेल : पनवेल जवळील जुना पुणे-मुंबई महामार्गावर Old Mumbai Pune Express Accident मुंबईकडे जाणार्या लेनवर ठोंबरेवाडी गावाजवळ आज सकाळी भरधाव मारुती सुझुकी सेलेरिओ गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जावून गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात गाडी चालकाचा गंभीररित्या जखमी होवून मृत्यू झाला आहे. तर गाडीतील दोघेजण जखमी झाले आहेत. Panvel Old Mumbai Pune Express Accident
गाडी चालक विजय पवार (४९ रा.कराड) हे त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी सेलेरिओ गाडी क्रं.एमएच-४६-बीएफ-९५७८ ही गाडी घेवून लोणावळा ते पनवेल असा प्रवास करीत असताना शेडुंग टोल नाका ठोंबरेवाडी येथे त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून रस्त्यावर असलेल्या झाडावर जावून गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात ते स्वतः गंभीररित्या जखमी होवून मयत झाले आहेत. तर गाडीतील प्रवासी भिकाजी गायकवाड (५८) व संगीता गायकवाड (७४) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. Panvel Old Mumbai Pune Express Accident
- #Panvel News
- #भरधाव वाहनाची झाडाला धडक
- #Old Mumbai Pune Express Accident News
- #Old Mumbai Pune Express
- #Old Mumbai Pune Express Traffic
- #Old Mumbai Pune Express News
- #Old Mumbai Pune Express Today News
- #Panvel Breaking News
- #Old Mumbai Pune Express Photo
- #Old Mumbai Pune Express Google News
- #Old Mumbai Pune Express Latest News
