मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pooja Khedkar Case Update : पूजा खेडकरवर UPSC ची मोठी कारवाई, ती आता IAS अधिकारी होणार नाही, परीक्षा देण्यावरही बंदी

• Pooja Khedkar Case Update UPSC ने Pooja Khedkar CSE-2022 ची उमेदवारी देखील रद्द केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

IAS Pooja Khedkar

•Pooja Khedkar Case Update UPSC ने Pooja Khedkar CSE-2022 ची उमेदवारी देखील रद्द केली आहे. आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

ANI :- वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या IAS पूजा खेडकरवर UPSC ने मोठी कारवाई केली आहे. आता ती आयएएस होणार नाही. UPSC ने पूजा खेडकरला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास किंवा निवड करण्यास मनाई केली आहे. याशिवाय, त्यांची CSE-2022 साठीची उमेदवारीही आयोगाने रद्द केली आहे. आयोगाने एक निवेदन जारी करून या कारवाईची माहिती दिली.

यूपीएससीने सांगितले की, सर्व नोंदी तपासल्यानंतर असे समोर आले की, पूजा खेडकरने CSE-2022 च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. आयोगाने CSE च्या गेल्या 15 वर्षांच्या डेटाचे पुनरावलोकन केले ज्यामध्ये 15 हजारांहून अधिक उमेदवारांचा समावेश होता.

विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. पूजा खेडकरच्या अंतरिम जामिनावर बुधवारी (31 जुलै) दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. न्यायालय 1 ऑगस्ट रोजी निकाल देणार आहे.

यूपीएससीने पूजा खेडकरला नोटीसही बजावली होती. खेडकर यांनी नाव, वडिलांचे आणि आईचे नाव, छायाचित्र/स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि बदल करून बनावट ओळख निर्माण करून परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न करण्याच्या संधीचा गैरफायदा घेतल्याचे आयोगाला तपासात आढळून आले.

हेही वाचा: Pritam Mhatre : दाऊदला भर चौकात फाशी द्या ; शेतकरी कामगार पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

शेअर करा