मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Daund News : ओबीसी महाएल्गार मोर्चाला पाटसमध्ये अडवले

Daund News : दौंड : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

ओबीसी महाएल्गार मोर्चाला पाटसमध्ये अडवले पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
ओबीसी महाएल्गार मोर्चाला पाटसमध्ये अडवले पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Daund News : पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात


Daund News : दौंड : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला आहे. मात्र पाटस (ता. दौंड) येथून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या ओबीसी महाएल्गार मोर्चाला पोलिसांनी अडवले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पाटस टोलनाका परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लक्ष्मण हाके यांनी पुण्यातून मोर्चाला सुरुवात केली. नॅशनल हायवेजवळ मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पाटस टोलनाका परिसरात भेट देत लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली.https://maharashtramirror.com/ Daund News
पोलिस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु लक्ष्मण हाके हे मोर्चा मुंबईच्या दिशेने नेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. https://maharashtramirror.com/ Daund News
‘पोलिसांनी अडवलं तरी आम्ही जाणारच’
लक्ष्मण हाके म्हणाले, “आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. आम्ही सर्व मुंबईच्या दिशेने जात आहोत. पोलिसांनी अडवलं तरी आम्ही जाणारच आहोत. ओबीसींचा केवळ फक्त मतासाठी वापर केला जात आहे. मनोज जरांगे ओबीसीचे आरक्षण संपवू पाहत आहेत. त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.”https://maharashtramirror.com/ Daund News
पाटस टोलनाका परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल म्हणाले, “आम्ही हाके यांना मोर्चा काढू नका म्हणून सूचना दिली होती. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात मोर्चा काढण्याची हाकेंना परवानगी दिलेली नाही. आम्हीही हाकेंना परवानगी दिली नाही. त्यामुळे मोर्चा आम्ही अडवला आहे, सध्या संवाद सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Daund News
त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या शासनापर्यंत पोहोचवत आहोत. तोडगा काढण्यासाठी सकारात्मक आहोत.” दरम्यान, पाटस टोलनाका परिसरात सध्या मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

शेअर करा