मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ना ओटीपी, ना लिंक, तरीही बँक खात्यातून पैसे लंपास

अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून आलेला कॉल फिर्यादी यांनी रिसिव्ह केला नाही तरीही…

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

ना ओटीपी, ना लिंक, तरीही बँक खात्यातून पैसे लंपास

अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून आलेला कॉल फिर्यादी यांनी रिसिव्ह केला नाही तरीही…

पिंपरी: एका अज्ञात सायबर चोरट्याने तळेगाव दाभाडे येथील एका व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यातून ९७ हजार ९०० रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, पीडित व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला संशयास्पद कॉल स्वीकारला नसतानाही ही चोरी झाली आहे. या चोरीसाठी सायबर चोरट्यांनी लिंक पाठविली नाही किंवा ओटीपीही विचारलेला नाही. ही घटना २१ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्‍यान घडली.

याबाबत एका पुरूष फिर्यादीने मंगळवारी (दि. ५ मे) रोजी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी हे २१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:१९ च्या सुमारास आपल्या घरी असताना त्यांना एका अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून (९८३४५३१५९० वर ७००२५०९८७३ वरून) कॉल आला. फिर्यादी यांनी तो कॉल रिसिव्ह केला नाही. मात्र, त्यानंतर रात्री ११:४९ आणि ११:५० च्या सुमारास त्यांच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांतून अनुक्रमे ९४ हजार रुपये आणि तीन हजार ९०० रुपये अशा एकूण ९७ हजार ९०० रुपयांचे व्यवहार झाले.

हे पैसे एका अज्ञात यूपीआय आयडीवर (८०१७४००४६७-@ibl) वर्ग झाले आहेत. या व्यवहारांबाबत फिर्यादी यांना कोणताही मेसेज प्राप्त झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी २२ एप्रिल रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी यांना आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्‍यातील निरीक्षक (गुन्हे) कांबळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा