मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : वैद्यकीय महाविद्यालयांत रुग्ण सुरक्षा समिती अनिवार्य

Pune News :पुणे : रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान होणाऱ्या संभाव्य चुका, औषधोपचारातील धोके आणि शस्त्रक्रियेशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी आता देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांना रुग्ण सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करावी लागणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

वैद्यकीय महाविद्यालयांत रुग्ण सुरक्षा समिती अनिवार्य
वैद्यकीय महाविद्यालयांत रुग्ण सुरक्षा समिती अनिवार्य

Pune News : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे निर्देश; समन्वय अधिकाऱ्याची नियुक्तीही बंधनकारक

Pune News :पुणे : रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान होणाऱ्या संभाव्य चुका, औषधोपचारातील धोके आणि शस्त्रक्रियेशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी आता देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांना रुग्ण सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करावी लागणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयात रुग्ण सुरक्षा समिती किंवा कक्ष स्थापन करणे तसेच रुग्ण सुरक्षा समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत संस्थात्मक पातळीवर देखरेख ठेवण्यास आणि उपचार प्रक्रियेतील त्रुटी रोखण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अतिरिक्त महासंचालकांनी मे महिन्यात रुग्ण सुरक्षा उपाययोजना अधिक बळकट करण्याबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानंतर आयोगाने देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य, संचालक आणि संस्थाप्रमुखांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रत्येक संस्थेने महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न रुग्णालयासाठी रुग्ण सुरक्षा समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे आयोगाने नमूद केले आहे.

रुग्ण सुरक्षेच्या विविध पैलूंवर देखरेख
रुग्ण सुरक्षा समन्वय अधिकारी संस्थेतील रुग्ण सुरक्षेशी संबंधित बाबींवर नियमित देखरेख ठेवणार आहे. उपचारादरम्यान उद्भवू शकणारे धोके, प्रक्रियेतील त्रुटी आणि सुरक्षिततेशी निगडित समस्यांची ओळख पटवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी या अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

रुग्ण सुरक्षा समितीमध्ये विविध वैद्यकीय शाखांचे प्रतिनिधी तसेच रुग्ण सुरक्षेच्या ११ प्रमुख क्षेत्रांशी संबंधित प्रतिनिधींचा समावेश करणे अनिवार्य आहे. औषध सुरक्षा, शस्त्रक्रियेदरम्यानची सुरक्षितता, रक्त संक्रमण सुरक्षा आणि आरोग्य संस्थेतील एकूण सुरक्षितता अशा महत्त्वाच्या क्षेत्रांचा त्यात समावेश आहे.

त्रुटी रोखण्यावर भर
रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेणे, संभाव्य त्रुटी ओळखणे आणि त्या टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, ही समितीची प्रमुख उद्दिष्टे असतील. रुग्ण सुरक्षेशी संबंधित विविध घटकांचा समन्वय साधून उपचार प्रक्रियेत सुरक्षिततेचे निकष अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाणार आहे. या निर्देशांमुळे वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये रुग्ण सुरक्षेला अधिक संघटित स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा