मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

हातभट्ट्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची गरज: रामदास आठवले

प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

हातभट्ट्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची गरज: रामदास आठवले

प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन

पिंपरी: फुगेवाडी येथे विषारी दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी बोलताना त्यांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर कारवाईची आवश्यकता व्यक्त केली.

रामदास आठवले म्हणाले की, प्रशासनाकडून दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात, मात्र काही काळानंतर त्या पुन्हा सुरू होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा अवैध व्यवसायांचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.

मृतांच्या नातेवाईकांना तातडीने रोजगार द्यावा
विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांबद्दल शोक व्यक्त करताना त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना तातडीने कंत्राट पध्दतीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यानंतर नियमित प्रक्रियेनुसार पुढील निर्णय घ्यावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे केली.

दोषींवर कठोर कारवाई व्हावी
देशातील विविध भागांमध्ये केमिकलयुक्त व विषारी दारूची विक्री होत असल्याने अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अवैध हातभट्ट्यांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करणे ही काळाची गरज असल्याचेही आठवले यांनी नमूद केले. विषारी दारू प्रकरणातील पीडित कुटुंबांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

शेअर करा