मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण व्हावे यासाठी हालचाली?

Delhi News : महत्वाचे मुद्दे *राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अप) सात ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी घेतली भेट *ज्येष्ठ नेत्यांनी स्वतंत्रपणे हालचाली सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा *गेल्या आठवड्यात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही शाह य

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण व्हावे यासाठी हालचाली? सुनेत्रा, पार्थ यांना बाजूला ठेवून अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांची मोर्चेबांधणी; अमित शाह यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण; शरद पवार गटासोबत एकत्र येण्याच्या शक्यतेची चाचपणी
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण व्हावे यासाठी हालचाली? सुनेत्रा, पार्थ यांना बाजूला ठेवून अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांची मोर्चेबांधणी; अमित शाह यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण; शरद पवार गटासोबत एकत्र येण्याच्या शक्यतेची चाचपणी

Delhi News : सुनेत्रा, पार्थ यांना बाजूला ठेवून अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांची मोर्चेबांधणी; अमित शाह यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण; शरद पवार गटासोबत एकत्र येण्याच्या शक्यतेची चाचपणी

Delhi News : महत्वाचे मुद्दे
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अप) सात ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी घेतली भेट
*ज्येष्ठ नेत्यांनी स्वतंत्रपणे हालचाली सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
*गेल्या आठवड्यात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही शाह यांची घेतली भेट
*पार्थ पवार यांना एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावे अशी मागणीhttps://maharashtramirror.com/ Delhi News

Delhi News : नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. मात्र, या प्रक्रियेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना बाजूला ठेवून अजित पवार गटातील काही ज्येष्ठ नेत्यांनी स्वतंत्रपणे हालचाली सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

पटेल, तटकरे, मुश्रीफ, भुजबळांचा पुढाकार


एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या नेत्यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण करून एकत्रित पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही अमित शाह यांची भेट घेतली होती. त्या वेळी विलीनीकरणानंतर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवावी, अशी भूमिका मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, शरद पवार गटाला ही सूचना मान्य होण्याची शक्यता कमी असल्याचेही राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांना मात्र पक्षातील सत्तावाटप अधिक सर्वसमावेशक असावे, असे वाटत असल्याची चर्चा आहे. पार्थ पवार यांची महत्त्वाकांक्षा आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या अपेक्षा यांच्यात मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावे, अशीही इच्छा असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील अर्थखाते पुन्हा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवावे, अशी त्यांची मागणी असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

दोन्ही गटांना केंद्रात प्रत्येकी एक मंत्रिपद


दरम्यान, भाजपला राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आणून एनडीएची ताकद वाढवायची आहे. यासाठी दोन्ही गटांना केंद्रात प्रत्येकी एक मंत्रिपद देण्याचा पर्यायही चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठा आणि बिगरब्राह्मण मतदारांमध्ये आघाडीची पकड मजबूत करण्यासाठी एकत्रित राष्ट्रवादी उपयुक्त ठरू शकते, असे भाजपच्या नेतृत्वाला वाटत असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी या भेटीला पक्षांतर्गत मतभेदांचा रंग देण्यास विरोध केला आहे. दिवंगत अजितदादांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या विषयांवर तसेच पक्षाच्या हिताच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही नियोजित औपचारिक भेट होती, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात समन्वय नसल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरद पवार गटाकडून अद्याप अंतिम निर्णय नाही
दुसरीकडे, शरद पवार गटाकडून अद्याप विलीनीकरण किंवा एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची सोमवारी दुपारी मुंबईत बैठक होणार असून, त्यामध्ये या घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण प्रत्यक्षात येणार की अजित पवार गटातील अंतर्गत मतभेदांमुळे नव्या राजकीय संघर्षाला सुरुवात होणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा