मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : संजय राऊतांच्या आरोपांना नवनाथ बन यांचे सडेतोड प्रत्युत्तर; ‘पक्ष नाही, गट नाही, तुमचा तर बचत गट उरलाय’

Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवरून खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

संजय राऊतांच्या आरोपांना नवनाथ बन यांचे सडेतोड प्रत्युत्तर; ‘पक्ष नाही, गट नाही, तुमचा तर बचत गट उरलाय’
संजय राऊतांच्या आरोपांना नवनाथ बन यांचे सडेतोड प्रत्युत्तर; ‘पक्ष नाही, गट नाही, तुमचा तर बचत गट उरलाय’

Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवरून खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचा शिंदे गट आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र पक्ष नसून भविष्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीमुळे हे पक्ष भाजपमध्ये विलीन होतील, असा आरोप राऊत यांनी केला होता. त्यांच्या या विधानावर बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत जोरदार पलटवार केला.https://maharashtramirror.com/ Mumbai news

‘बाळासाहेबांचे विचार सोडले, हाच तुमचा स्वाभिमान का?’
संजय राऊत यांच्यावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व सोडून काँग्रेसचे विचार स्वीकारणे, हाच तुमचा स्वाभिमान आहे का? महाराष्ट्रातील मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचे काम तुम्ही अडीच वर्षांच्या सत्ताकाळात केले. पत्राचाळ प्रकरणात मराठी माणसांच्या घरांचा प्रश्न निर्माण झाला. व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यामुळे एका व्यक्तीचा डोळा फोडण्यात आला, पत्रकाराला बातमी दिल्यामुळे अटक करण्यात आली आणि विरोधकांची घरे तोडण्यापर्यंत तुमची मजल गेली. हा तुमचा स्वाभिमान आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.https://maharashtramirror.com/ Mumbai news

‘2019 मध्येच तुमचा स्वाभिमान गहाण पडला’
2019 मध्ये युतीचा धर्म मोडून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच तुमचा स्वाभिमान गहाण पडला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आता स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत, अशी टीका बन यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पक्ष काँग्रेसच्या विचारांचा होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, सत्तेसाठी हिंदुत्व सोडून काँग्रेससोबत जाणे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वापुढे झुकणे आणि मुख्यमंत्रीपदासाठी राजकीय संकेत मोडणे, याला स्वाभिमान नव्हे तर लाचारी म्हणतात. हे पाप संजय राऊत यांनी केले आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

‘पक्षही नाही, गटही नाही; तुमचा तर बचत गट उरलाय’
नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर आणखी बोचरी टीका करताना म्हटले की, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्यापेक्षा आधी तुम्ही स्वतःच्या पक्षाची स्थिती पाहावी. तुमचा पक्ष राहुल गांधी यांच्या दावणीला बांधला आहे. मुळात तुमचा आता पक्षही नाही आणि गटही नाही, तर केवळ बचत गट उरला आहे. या बचत गटाचा अध्यक्षही तुम्ही राहुल गांधी यांच्याकडे सोपवला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असून, त्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे, असा गंभीर आरोपही बन यांनी केला.

संजय राऊत यांनी नेमका काय आरोप केला होता?
दरम्यान, संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे स्वतंत्र पक्ष नसून भविष्यात अमित शाह यांच्या प्रभावाखाली त्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल आणि भाजपमध्ये विलिनीकरण करण्याची वेळ त्यांच्यावर येईल, असा दावा त्यांनी केला होता.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची, तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मात्र, अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे रचले, अशी टीकाही राऊत यांनी केली होती. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनाथ झाला असून, भविष्यात भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरणार नाही, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, राऊतांच्या आरोपांना नवनाथ बन यांनी दिलेल्या या प्रत्युत्तरामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा