मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : नवी मुंबई निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार; 127 मतदारांचा पत्ता चक्क 'महापालिका आयुक्तांचे निवासस्थान'

Gajanan Kale On Election Commission : 'सुलभ शौचालय', 'पामबीच रस्ता' नंतर आता नवीन घोळ; मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली पोलखोल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Gajanan Kale: Instead of lashing out at others' parties, take out your own party and elect at least two MLAs; MNS Navi Mumbai District President Gajanan Kale

Gajanan Kale On Election Commission : 'सुलभ शौचालय', 'पामबीच रस्ता' नंतर आता नवीन घोळ; मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली पोलखोल

नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या Navi Mumbai Muncipal Corporation Election आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीत होत असलेला निवडणूक आयोगाचा कथित भोंगळ कारभार मनसेकडून सातत्याने उघडकीस आणला जात आहे. मतदारांच्या नोंदणीत 'सुलभ शौचालय' आणि 'पामबीच रस्ता' असे अयोग्य पत्ते नोंदवले जात असताना, आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे 127 मतदारांच्या नावापुढे थेट नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निवासी पत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. Navi Mumbai Latest News

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी हे प्रकार उघडकीस आणत निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

नेमका घोळ काय आहे?

काही दिवसांपूर्वी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील जुईनगर येथील सेक्टर-23 मधील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर एका व्यक्तीची मतदार म्हणून नोंदणी झाल्याचा प्रकार समोर आला होता.

त्यानंतर पामबीच रस्त्यावरच 250 मतदारांची नोंद झाल्याचे यादीत नमूद करण्यात आले होते.

आता गजानन काळे यांनी बेलापूर विधानसभेची 300 क्रमांकाची यादी सादर केली आहे. यात 'नेरूळ रेल्वे स्थानक ते पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास' या पत्त्यावर चक्क 127 मतदारांची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचे हे सरकारी निवासस्थान आहे, आणि एकाच ठिकाणी 127 मतदारांची नोंदणी होणे हा मोठा घोळ असल्याचे काळे यांनी सांगितले. या यादीत मोठ्या प्रमाणावर अमराठी आणि परराज्यातील मतदारांची नावे असल्याची माहितीही काळे यांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे निर्देश असल्याने निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी प्रक्रियेला वेग दिला जात आहे, परंतु यादीत सातत्याने होणाऱ्या अशा चुकांमुळे आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शेअर करा