मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुण्याच्या 'नानाची वाडी'मध्ये नटसम्राटाला निरोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून दिला अंत्यपेटीला खांदा!'

Pune News पुणे :- अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर (वय 75) गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होते.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुण्याच्या 'नानाची वाडी'मध्ये नटसम्राटाला निरोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून दिला अंत्यपेटीला खांदा!'
पुण्याच्या 'नानाची वाडी'मध्ये नटसम्राटाला निरोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून दिला अंत्यपेटीला खांदा!'

Pune News : गोव्यातून रात्री उशिरा पुण्यात आणले पार्थिव; डोणजे गावात नाना पाटेकरांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार पूर्ण'

Pune News पुणे :- अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर (वय 75) गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होते. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी डॉक्टरांना मेसेज पाठवला होता. मात्र, डॉक्टरांनी हा मेसेज सकाळी 4 वाजता पाहिला. वैद्यकीय पथक तातडीने नानांच्या घरी पोहोचले, तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. डॉक्टरांनी सलग ४५ मिनिटे नानांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र त्यांना यश आले नाही आणि कलाविश्वाने आपला 'नटसम्राट' गमावला.https://maharashtramirror.com/ Pune News

पुणे विमानतळावर मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; अंत्यपेटीला खांदा देऊन वाहिली श्रद्धांजली

नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्यातून विशेष विमानाने पुणे विमानतळावर आणण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून नानांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व मुलगा मल्हार पाटेकर आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल न पाळता थेट नानांच्या अंत्यपेटीला खांदा दिला आणि रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीतून नाना आणि त्यांच्यातील दृढ व जिव्हाळ्याच्या संबंधांची प्रचिती दिसून आली.

'नानाची वाडी'त अश्रूंचा बांध; इच्छेनुसार लाकडांच्या सरणावर अंतिम संस्कार

पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील 'नानाची वाडी' येथे रात्री उशिरा नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नानांची शेवटची इच्छा पूर्ण करत, त्यांनी स्वतः आधीच बाजूला काढून ठेवलेल्या सुकलेल्या लाकडांच्या सरणावरच त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. नानांच्या जाण्याने डोणजे गावावर शोककळा पसरली असून, त्यांनी 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची आठवण काढत गावकऱ्यांनी आणि महाराष्ट्राने या महान कलावंताला अश्रूभ्रू निरोप दिला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा