मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : नाना पाटेकरांच्या निधनाबाबत गोवा पोलिसांकडून 'अनैसर्गिक मृत्यू'ची नोंद; मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू!'

Pune News : पुणे :- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (वय 75) यांच्या अचानक झालेल्या निधनाने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

नाना पाटेकरांच्या निधनाबाबत गोवा पोलिसांकडून 'अनैसर्गिक मृत्यू'ची नोंद; मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू!'
नाना पाटेकरांच्या निधनाबाबत गोवा पोलिसांकडून 'अनैसर्गिक मृत्यू'ची नोंद; मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू!'

Pune News : 'BNSS कलम 194 अंतर्गत प्रकरणाची नोंद; कुटुंबियांचे जबाब नोंदवून शवविच्छेदनाच्या निष्कर्षाकडे पोलिसांचे लक्ष'

Pune News : पुणे :- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (वय 75) यांच्या अचानक झालेल्या निधनाने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी पहाटे गोव्यातील डोना पावला येथील ओशन पार्क निवासस्थानी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी आता गोवा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 194 अंतर्गत 'अनैसर्गिक मृत्यू'ची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मृत्यूमागील नेमका घटनाक्रम आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

कुटुंबियांचे जबाब अन् वैद्यकीय निष्कर्षांची पडताळणी

तपासाचा भाग म्हणून पोलीस नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे सविस्तर जबाब नोंदवणार आहेत. निधनापूर्वी त्यांची प्रकृती कशी होती, त्यांना वैद्यकीय त्रास होत होता का आणि मृत्यूपूर्वी नेमके काय घडले, याची माहिती गोळा केली जात आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार ते हृदयविकाराच्या आजारावर औषधोपचार घेत होते. मात्र, निधनाचे अधिकृत वैद्यकीय कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन (Autopsy) आणि वैद्यकीय तपासणी अहवालाची वाट पाहिली जात आहे.

संशयास्पद बाब आढळल्यास पुढील कारवाई; पोलिसांचे प्रकरणावर लक्ष

तपासादरम्यान आणि वैद्यकीय अहवालातून नाना पाटेकर यांचा मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यास ही कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार बंद केली जाईल. मात्र, तपासात किंवा वैद्यकीय अहवालात कोणतीही संशयास्पद बाब अथवा वेगळे पुरावे समोर आल्यास पोलीस पुढील कायदेशीर कारवाईची दिशा ठरवतील. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष गोवा पोलिसांच्या या तपासातून समोर येणाऱ्या अधिकृत निष्कर्षांकडे लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा