मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nagpur News : महसूलमंत्र्यांच्या धाडीचा दणका: नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याचे निलंबन!

• चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अचानक तपासणीत ड्रॉवरमध्ये आढळले होते रोख 5 हजार रुपये ; भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर थेट कारवाई ; सह दुय्यम निबंधक अ.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Chandrashekhar Bawankule

• चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अचानक तपासणीत ड्रॉवरमध्ये आढळले होते रोख 5 हजार रुपये ; भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर थेट कारवाई ; सह दुय्यम निबंधक अ. तु. कपाले निलंबित

नागपूर :- जागा खरेदी-विक्री कार्यालयात नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट नागपूरच्या खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर धाड टाकून तेथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. या धाडसत्राच्या दोन दिवसानंतर, महसूलमंत्र्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारत तेथील सह दुय्यम निबंधकाचे निलंबन केले आहे. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे.

धाडीत सापडली होती रोख रक्कम

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी अचानक खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात धाड टाकत कार्यालयाची झाडाझडती घेतली. यावेळी एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये रोख 5 हजार रुपये सापडले होते. नोंदणी व मुद्रांक कार्यालयात सातत्याने भ्रष्टाचार होत असून नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार बावनकुळे यांच्याकडे आली होती.

'हा सगळा भ्रष्टाचार अवघ्या महाराष्ट्राने पाहिला'

बावनकुळे यांनी धाड टाकली, तेव्हा त्यांच्यासोबत पत्रकार आणि कॅमेरेही असल्याने हा सगळा भ्रष्टाचार अवघ्या महाराष्ट्राने पाहिला गेला. येथील कार्यालयाच्या गैरप्रकाराबाबतच्या अनेक तक्रारी आल्याने आपण इथं आलो, अशी प्रतिक्रिया त्यावेळी बावनकुळे यांनी दिली होती. त्यानंतर, त्यांनी सापडलेले पैसे जप्त करून पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते.

सह दुय्यम निबंधकाचे निलंबन

या संपूर्ण घटनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून निलंबन आदेश जारी करण्यात आला असून, सह दुय्यम निबंधक अ. तु. कपाले यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूलमंत्र्यांनी अचानक दिलेल्या भेटीत रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली होती. आता बावनकुळे यांच्या आदेशान्वये या अधिकाऱ्यावर कठोर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: Pune Crime News : पुण्याच्या कोंढव्यात तपास यंत्रणांची छापेमारी; 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर्स झळकल्याने खळबळ

शेअर करा