मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nagpur News : नागपुरात 'अपना ढाबा' वर पोलिसांची धाड: शिंदे गटाच्या शहरप्रमुखाच्या हॉटेलमध्ये अवैध दारूसाठा!

•राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण: सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर धंदा; 'बकासूर रेस्टॉरंट'वरही कारवाई!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nagpur News : नागपुरात 'अपना ढाबा' वर पोलिसांची धाड: शिंदे गटाच्या शहरप्रमुखाच्या हॉटेलमध्ये अवैध दारूसाठा!

•राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण: सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर धंदा; 'बकासूर रेस्टॉरंट'वरही कारवाई!

नागपूर :- नागपूर शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे (शिंदे गट) नागपूर शहरप्रमुख मंगेश काशीकर यांच्या मालकीच्या हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकून मोठा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. या धडक कारवाईने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील बजाजनगर परिसरात असलेल्या ‘अपना ढाबा एनएच 1’ या हॉटेलवर परिमंडळ एकच्या उपायुक्तांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या छाप्यात हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दारूचा साठा जप्त केला आणि हॉटेलला कुलूप लावून सील केले.

ही कारवाई केवळ अवैध दारूविक्रीवर नव्हती, तर यामागे थेट सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्ती असल्याने या घटनेने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ‘अपना ढाबा एनएच 1’ हे हॉटेल शिवसेना शिंदे गटाचे नागपूर शहरप्रमुख मंगेश काशीकर यांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी हॉटेलचे संचालक मंगेश काशीकर आणि भरत दुबे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईमुळे केवळ बजाजनगरच नव्हे, तर संपूर्ण नागपूर शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईनंतर, याच परिसरातील ‘बकासूर रेस्टॉरंट’ वरही पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Mumbai Tadipar News : तडीपार गुन्हेगार जेरबंद, लाखो रुपयांचे सोने जप्त!

शेअर करा