मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

खेडमध्ये दोन ग्रॅम सोन्यासाठी खून करून मृतदेह नदीत फेकला

८० वर्ष वृद्धेच्या खून प्रकरणात तरुणाला अटक; सराफामुळे उघडकीस आली घटना

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

खेडमध्ये दोन ग्रॅम सोन्यासाठी खून करून मृतदेह नदीत फेकला

८० वर्ष वृद्धेच्या खून प्रकरणात तरुणाला अटक; सराफामुळे उघडकीस आली घटना

पुणे: वृद्धेच्या अंगावरील दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरण्यासाठी तरुणाने तिचा खून करून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून तो नदीत फेकून दिला. मात्र हे दागिने ज्या सराफाकडे विक्री केले गेले त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे युवकाला अटक करण्यात उत्तर महाळुंगे पोलिसांना यश आले आहे.

कैलास कुंडलिक मारगज (वय ३६, रा. खेड, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तर समीर बाळू मरगज (वय २७) याने फिर्याद दिली असून, त्याची आजी सिंधूबाई विठोबा मरगज (वय ८०) यांचा खून झाला आहे.

मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून, नदीत फेकला
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधूबाई यांच्या अंगावरील दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळविण्यासाठी कैलास याने त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून, नदीत फेकून दिला. दरम्यान, २ मे रोजी ही घटना घडली होती. तर तीन दिवसांनी सिंधुबाई बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली.

पत्नीचे दागिने असल्याची बतावणी
दुसरीकडे कैलास याने हे दागिने एका सराफाकडे विकले. त्याचे त्याला २५ हजार रुपये मिळाले. हे दागिने विक्री करण्यासाठी त्याने एका मित्राला बरोबर नेले होते. पत्नीचे दागिने असल्याचे त्याने सांगितले होते.

या दागिन्यात एक चंद्रकोर होती. तर दुसरीकडे सिंधूबाई बेपत्ता झाल्या तेव्हा त्याच्याकडे ही चंद्रकोर असल्याचे पोलिसांनी अनेकाना कळविले होते. त्यातून एका सराफाने पोलिसांशी संपर्क करीत कैलास याने ही चंद्रकोर विक्री केल्याचे कळविले. तसेच कैलास याच्या मित्राने समीर याची आजी बेपत्ता झाल्यावर तिच्याकडे असलेली चंद्रकोर विक्री झाल्याची माहिती समीर याला दिली.

पोलिस आणि समीर यांनी संबंधित सराफाकडे चौकशी केली असता कैलास आणि त्याच्या मित्राचे नाव समोर आले. त्यातून पोलिसांनी कैलास याला हिसका दाखवताच त्याने गुन्हा कबुल केला.

कैलास याने सिंधूबाई यांचा मृतदेह नदीत फेकला होता. तो एका दगडाजवळ जाऊन अडकला होता. मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात असल्याने त्याचे विघटन पूर्ण झाले नव्हते. पोलिसांनी नदीत शोध घेतल्यावर ३०० मीटर पुढे दगडाजवळ अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

शेअर करा