मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Spa Racket : खार-बांद्रा-जुहूतील 'स्पा' केंद्रांवर सेक्स रॅकेटचा संशय: 'फुल सर्व्हिस'चा नवा ट्रेंड?

मुंबईत वाढती 'स्पा' केंद्रांमधील अनैतिक धंद्यांची चर्चा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Spa Racket : खार-बांद्रा-जुहूतील 'स्पा' केंद्रांवर सेक्स रॅकेटचा संशय: 'फुल सर्व्हिस'चा नवा ट्रेंड?

मुंबईत वाढती 'स्पा' केंद्रांमधील अनैतिक धंद्यांची चर्चा

महाराष्ट्र मिरर:मुंबई- सौभाग्या शर्मा:

Mumbai Spa Racket : खार, बांद्रा, जुहू भागातील काही 'स्पा' केंद्रांमध्ये आरामदायी सेवेच्या आड "फुल सर्व्हिस" या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मिळत आहे. Mumbai Spa Sex Racket या स्पा केंद्रांमध्ये थाई आणि परदेशी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शौकीन या ठिकाणी आकर्षित होत आहेत. तक्रारी असूनही पोलिसांची Mumbai Police कारवाई केवळ दिखाऊ असल्याची नागरिकांमधून चर्चा आहे.

पोलिसांची कारवाई अपुरी?

गेल्या काही महिन्यांत, मुंबई पोलिसांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक पथकाने काही स्पा केंद्रांवर छापे टाकले. खार येथील 'मिझमार थाई स्पा'वर केलेल्या कारवाईत सेक्स रॅकेट उघडकीस आले असून, चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, असे प्रकार वारंवार उघड होत असूनही पुन्हा पुन्हा हे व्यवसाय जोरात सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निवडणुका जवळ येत असल्याने पोलिसांची कारवाई वाढली आहे, तरी या "स्पा" केंद्रांकडे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'स्पा'च्या नावाखाली वेश्याव्यवसाय आणि तरुणींवर अन्याय

या व्यवसायात तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो, आणि त्यांना अनैतिक धंद्यांमध्ये ढकलले जाते. याविरुद्ध ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये नाराजी असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित व्यक्तींच्या संगनमतामुळेच हे व्यवसाय चालत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांचा निष्काळजीपणा?

मुंबई पोलिस Mumbai Police जगातील आदरणीय पोलिस दलांमध्ये गणले जातात, मात्र 'स्पा' व्यवसायांवर अंकुश ठेवण्यात त्यांना अपयश येत आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याचे पालन का होत नाही, हे प्रश्न विचारात घेण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: Mumbai Spa Sex Racket : खार-बांद्रा-जुहू स्पा आणि आंबट शौकिनांची रेलचेल : 'फुल सर्व्हिस' 'स्पा' 'रंग-लीला'

हेही वाचा: Mumbai Khar Spa Sex Racket Busted | खार मधिल 'मिझमार थाई स्पा' हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : पीडित मुलींची सुटका

शेअर करा