मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Khar Spa Sex Racket Busted | खार मधिल 'मिझमार थाई स्पा' हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : पीडित मुलींची सुटका

Mumbai Khar Spa Sex Racket Busted | मुंबई पोलीस, गुन्हे शाखा अनैतिक व्यापार प्रतिबंध पथकाकडून कारवाई पडद्यामागील सूत्रधारांचा तपास होणार का ?

M
mubarak

1 मिनिट वाचन

mizmar spa sex racket

  • Mumbai Khar Spa Sex Racket Busted | मुंबई पोलीस, गुन्हे शाखा अनैतिक व्यापार प्रतिबंध पथकाकडून कारवाई
  • पडद्यामागील सूत्रधारांचा तपास होणार का ?
  • मुंबई, दि. २६ सप्टेंबर,
    महाराष्ट्र मिरर

    Mumbai Khar Spa Sex Racket Busted | मुंबईतील खार परिसरात 'स्पा'च्या नावाखाली चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. मुंबई पोलीस, गुन्हे शाखा अनैतिक व्यापार प्रतिबंध पथकाकडून कारवाई करत 'मिझमार थाई स्पा' येथील सेक्स रॅकेट उद्धवस्त करण्यात आले आहे. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    याच Mizmar Thai Spa स्पाकडून काही वर्षांपूर्वी आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना, क्रिकेटपटू यांच्यासह बॉलिवूड मधील कलाकारांनी हजेरी लावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच 'स्पा' चे पडद्यामागील खरे सूत्रधारांचा तपास लावण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.

    याबाबत पोलीस शिपाई किशोर मारुती घुगे (अंमलबजावणी कक्ष) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी अमरिन हसीब शेख, आलम, मुस्कान आणि श्रीमती टी. नोकसेंपेला यांच्याविरुद्ध खार पोलीस ठाण्यात स्त्री मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (१९५६) ३,४,५ व बीएनएस १४३ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Mumbai Police मुंबई पोलीस, गुन्हे शाखा, अनैतिक व्यापार प्रतिबंध पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता कदम यांच्या पथकाकडून सदर सापळा कारवाई करण्यात आली आहे.

    अधिक माहिती अशी कि, गुन्हे शाखा, अनैतिक व्यापार प्रतिबंध पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता कदम यांना 'मिझमार थाई स्पा' ८ वा मजला, लिओ बिल्डिंग, लिंकिंग रोड, खार पश्चिम, मुंबई येथे सेक्स रॅकेट सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

    पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सेक्स सर्व्हिसची मागणी केली असता स्पा कडून ६,५०० रुपयात फुल सर्व्हिस ऑफर केली. यावेळी पोलिसांनी धाड टाकून सदर स्पा येथे सुरु असणारे सेक्स रॅकेट उध्दवस्त केले. यावेळी मुलींची सुटका करण्यात आली. यात एका परदेशी मुलीचा सहभाग होता.

    हेही वाचा: PM Modi Pune Visit Cancelled : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द!

    हेही वाचा: Pune Spa Racket | बुधवार पेठ नव्हे, आंबट शौकिनांचा मोर्चा आता 'फुल सर्व्हिस' देणाऱ्या 'स्पा'कडे

    https://bollywoodglitterati.blogspot.com/2019/05/nora-fatehi-mohammad-azharuddin-ashish.html

    शेअर करा