मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : मोहम्मदवाडीतील नवीन रस्ता झाला खड्डेमय

*परिसरातील बांधकाम व्यावसायिकांची जड वाहने, सिमेंट मिक्सर आणि डंपर्सची सतत होणारी ये-जा कारणीभूत *नवीन डांबरी रस्ता पूर्णपणे सेट होण्यासाठी आणि वजन पेलण्यासाठी ठरावीक कालावधीची गरज असते *मात्र, रस्ता खुला होताच कोणतीही बंधने न घालता येथून अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू *वरवर डांबराचा थर देऊन काम उ

VK
Vikrant Kulkarni

3 मिनिट वाचन

मोहम्मदवाडीतील नवीन रस्ता झाला खड्डेमय
मोहम्मदवाडीतील नवीन रस्ता झाला खड्डेमय

Pune News : महिनाभरापूर्वी एका भीषण अपघातानंतर नव्याने रस्ता तयार करण्यात आला होता

महत्वाचे मुद्दे

*परिसरातील बांधकाम व्यावसायिकांची जड वाहने, सिमेंट मिक्सर आणि डंपर्सची सतत होणारी ये-जा कारणीभूत
*नवीन डांबरी रस्ता पूर्णपणे सेट होण्यासाठी आणि वजन पेलण्यासाठी ठरावीक कालावधीची गरज असते
*मात्र, रस्ता खुला होताच कोणतीही बंधने न घालता येथून अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू
*वरवर डांबराचा थर देऊन काम उरकण्याच्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या युतीमुळे नागरिकांना नाहक त्रास


"नवीन बनवलेला रस्ता काही दिवसांतच उखडतो ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर जड वाहनांमुळे हा रस्ता खराब झाला असेल, तर अशा वाहनांना या रस्त्यावरून जाण्याची परवानगी महापालिकेने का दिली? प्रशासनाने यावर वेळीच निर्बंध का घातले नाहीत? करदात्या नागरिकांच्या कष्टाचा पैसा अशा प्रकारे वारंवार निकृष्ट रस्त्यांच्या दुरुस्तीवर उधळला जाणे पूर्णपणे चुकीचे आहे. महापालिकेने याची तात्काळ दखल घेतली पाहिजे." - अशोक मेहेंदळे, स्थानिक रहिवासी https://maharashtramirror.com/ Pune News

Pune News : पुणे, धनश्री ओतारी

शहरात रस्ते दुरुस्तीच्या निविदेवरुन पालिकेच्या वर्तुळात नवा वाद सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण पूर्व भागात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच मोहम्मदवाडी नवनिर्मित रस्त्याची महिनाभरातच दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

मोहम्मदवाडी येथील रहेजा रिझर्व्ह सोसायटीजवळ काही दिवसांपूर्वीच बनवलेला नवीन रस्ता अल्पावधीतच उखडला असून त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. महिन्याभरापूर्वी एका भीषण अपघातानंतर नव्याने रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, काही दिवस उलटताच जैसे थे परिस्थिती झाल्याचे पाहायाला मिळत आहे. रस्ता इतक्या लवकर खराब झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. या रस्त्यावरून होणारी जड वाहनांची अनियंत्रित वाहतूक आणि निकृष्ट बांधकाम यामुळेच ही दुरवस्था झाल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

निष्पाप नागरिकाचा मृत्यू


काही महिन्यांपूर्वी याच परिसरात एका भीषण रस्ता अपघातात निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्याची मागणी लावून धरली होती. वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देणे, या उद्देशाने महापालिकेने या रस्त्याचे काम हाती घेतले होते. नागरिकांना वाटले होते की आता तरी प्रशासनाला जाग आली असून त्यांना खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळेल. मात्र, रस्ता तयार होऊन काही दिवस उलटत नाहीत तोवर डांबर उखडून रस्ता पूर्ववत खड्डेमय झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा हा 'सुधारणा' उपक्रम केवळ कागदावरच राहिला की काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तर निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे.

अवजड वाहनांची सर्रास वाहतूक


शिवाय रस्त्याची ही अवस्था होण्यामागे परिसरातील बांधकाम व्यावसायिकांची जड वाहने, सिमेंट मिक्सर आणि डंपर्सची सतत होणारी ये-जा कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नवीन डांबरी रस्ता पूर्णपणे सेट होण्यासाठी आणि वजन पेलण्यासाठी ठरावीक कालावधीची गरज असते. मात्र, रस्ता खुला होताच कोणतीही बंधने न घालता येथून अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू झाली.

स्थानिकांच्या प्रतिक्रिया


यासंदर्भात स्थानिक रहिवासी अशोक मेहेंदळे म्हणाले, "नवीन बनवलेला रस्ता काही दिवसांतच उखडतो ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर जड वाहनांमुळे हा रस्ता खराब झाला असेल, तर अशा वाहनांना या रस्त्यावरून जाण्याची परवानगी महापालिकेने का दिली? प्रशासनाने यावर वेळीच निर्बंध का घातले नाहीत? करदात्या नागरिकांच्या कष्टाचा पैसा अशा प्रकारे वारंवार निकृष्ट रस्त्यांच्या दुरुस्तीवर उधळला जाणे पूर्णपणे चुकीचे आहे. महापालिकेने याची तात्काळ दखल घेतली पाहिजे."

तर दुसऱ्या स्थानिक रहिवासी तारा सिंग यांनी प्रशासनाच्या निद्रिस्त कारभारावर बोट ठेवले. त्या म्हणाल्या, "एका भीषण अपघातानंतर हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यामुळे हा रस्ता अधिक सुरक्षित आणि दळणवळणासाठी सुलभ असेल अशी आमची अपेक्षा होती. परंतु, इतक्या कमी वेळात रस्त्याची झालेली दैना पाहून खूप निराशा झाली आहे. प्रशासनाने केवळ रस्ता बांधून मोकळे न होता, जड वाहनांपासून त्याचे संरक्षण करणे आणि बांधकामाच्या दर्जावर सतत देखरेख ठेवणे अत्यंत गरजेचे होते."

या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना याच परिसरात राहणारे वरिष्ठ पत्रकार नदीम इनामदार यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षावर तीव्र शब्दांत टीका केली. "पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन रस्त्याची पाहणी केली पाहिजे. रस्ता खराब होण्याचे नेमके कारण काय आहे. जड वाहनांची वाहतूक की कंत्राटदाराने केलेले निकृष्ट दर्जाचे काम—हे आधी स्पष्ट झाले पाहिजे. जर जड वाहनांमुळे नुकसान झाले असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि दंडात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत. तसेच, कंत्राटदाराने वापरलेल्या साहित्याचा दर्जा तपासला पाहिजे, जेणेकरून दोषींवर जबाबदारी निश्चित करता येईल. अशा मागण्या येथील स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत."

योग्य क्षमतेचे रस्ते बांधणे अपेक्षित


मुहंमदवाडी आणि आसपासच्या परिसरात नवीन गृहप्रकल्प वेगाने उभे राहत असल्याने येथे अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी महापालिकेने रस्ते बांधताना भविष्यातील वाहतुकीचा अंदाज घेऊन योग्य क्षमतेचे रस्ते बांधणे अपेक्षित आहे. केवळ वरवर डांबराचा थर देऊन काम उरकण्याच्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या युतीमुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता महापालिका याप्रकरणी कंत्राटदार आणि दोषींवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा