मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

MLA Sandip Joshi : नागपुरात भाजपला घरचा आहेर! मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच दूषित पाणीपुरवठा; आमदार संदीप जोशी आक्रमक

MLA Sandip Joshi On Nagpur BMC : महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, आयुक्तांना थेट आंदोलनाचा इशारा

V
Vivek

1 मिनिट वाचन

MLA Sandip Joshi : नागपुरात भाजपला घरचा आहेर! मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच दूषित पाणीपुरवठा; आमदार संदीप जोशी आक्रमक

MLA Sandip Joshi On Nagpur BMC : महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, आयुक्तांना थेट आंदोलनाचा इशारा

नागपूर :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असतानाच नागपूरमध्ये भाजपला त्यांच्याच एका आमदाराकडून घरचा आहेर मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील दूषित पाणीपुरवठ्यावरून आमदार संदीप जोशी Sandip Joshi यांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून ही समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली असून, अन्यथा नागरिकांसह कार्यालयात धडक देण्याचा इशारा दिला आहे.

नागपूरमधील स्वावलंबीनगर आणि दीनदयालनगर परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नागरिकांना दुर्गंधीयुक्त, गढूळ आणि आरोग्यास धोकादायक पाणी मिळत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार संदीप जोशी यांनी केला आहे. 'मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच ही परिस्थिती असेल, तर शहराच्या इतर भागांत काय चालू असेल याची कल्पनाच करवत नाही,' अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'जर या गंभीर समस्येची दखल घेतली नाही, तर मी परिसरातील जनतेसह 7 ऑगस्ट रोजी स्वतः आयुक्तांच्या कार्यालयात धडक देईन. यावेळी नागरिकांच्या रोषाला आयुक्तांना सामोरे जावे लागेल आणि लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल.'

नागपूर महापालिकेत अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातीलच पाणी समस्येवर त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने घेतलेली आक्रमक भूमिका भाजपची कोंडी करणारी आहे. या पत्रातील 'तुम्ही गप्प बसलात, म्हणून आम्हीही गप्प बसू, असा गैरसमज करू नका,' या स्पष्ट इशामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवरही दबाव वाढला आहे. या गंभीर समस्येवर महापालिका काय तोडगा काढते आणि भाजप पक्ष यावर काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शेअर करा