मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांचा सरकारला इशारा, मी नाही जनता सरकारवर नाराज आहे, मागण्या मान्य न केल्यास निवडणुकीत दाखवून देऊ

Bacchu Kadu Target Maharashtra Sarkar : रवी राणा यांच्यावर नाव न‌ घेता निशाणा लाडकी बहीण योजनेच्या पैसा हा जनतेचा आहे, तो काही आमदारांना बाप-दादांच्या कमाईचा पैसा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bacchu Kadu Prahar Janshakti Morcha Live Update

Bacchu Kadu  Target Maharashtra Sarkar : रवी राणा यांच्यावर नाव न‌ घेता निशाणा लाडकी बहीण योजनेच्या पैसा हा जनतेचा आहे, तो काही आमदारांना बाप-दादांच्या कमाईचा पैसा

अमरावती :- प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू Bacchu Kadu  यांनी सरकारला इशारा दिला आहे.सरकारवर मी नाही तर जनता नाराज, सरकार जर आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांना शिंदे सरकारला दिला आहे. तर दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष, दिव्यांगांसदर्भातले निर्णयही कळवले जात नाहीत असे म्हणत त्यांनी बोलताना खंत व्यक्त केली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या पैसा हा जनतेचा आहे, तो काही आमदारांना बाप-दादांच्या कमाईचा पैसा वाटतो, असे म्हणत त्यांनी रवी राणांच्या वक्तव्याचा नाव न घेता समाचार घेतला आहे.

नेमके बच्चू कडू काय म्हणाले?

बच्चू कडू म्हणाले की, आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केला आहे. जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या एवढेच आमचे काम आहे. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे आम्हाला कळवले सुद्धा जात नाही, अशी खंत एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे. तर अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावे लागते आणि भांडून आम्ही ते करून घेतो असे कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू म्हणाले की, सरकार हे लोकांसाठी असते आणि जर लोकांसाठी सरकार नसेल तर आमचा रक्तातील दोष म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा तो राहणारच आहे. काही आमदारांना असे वाटते आहे की आपण खूप मेहनत केली, घरदार विकून जो पैसा मिळाला तो आपण या लाडक्या बहिणीसाठी लावला. यांना वाटते आपल्या बाप दादाच्या कमाईतून ही योजना चालू आहे, हे चुकीचा आहे. जनतेचा पैसा आहे, सरकारी पैसा हा सगळा आहे. लोकं कर भरतात याचा विसर या लोकांना पडला आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली, दुग्धविकासासाठी मोठा निर्णय

शेअर करा