मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jalna News : जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती

Jalna News : जालना - मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणस्थळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी रात्री उशिरा भेट देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची उपोषणस्थळी भेट
जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची उपोषणस्थळी भेट

Jalna News : जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची उपोषणस्थळी भेट



Jalna News : जालना - मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणस्थळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी रात्री उशिरा भेट देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 309 जणांनी बलिदान दिले असून, त्यांच्या वारसांना सरकारने 10 लाख रुपयांची मदत दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.https://maharashtramirror.com/ Jalna News
तसेच, 222 जणांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज केले असून, हा मुद्दा शासन दरबारी सकारात्मक आहे, असेही त्यांनी सांगितले. 58 लाख कुणबी नोंदींच्या मागणीवर युद्धपातळीवर काम सुरू असून, ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येकाचे नाव जाहीर केले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.https://maharashtramirror.com/ Jalna News
जात पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा प्रमाणपत्र रद्द झाल्यास, अपील करून आयुक्तांकडे दाद मागता येते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ‘समाजाला जरांगे पाटील, तुमची गरज आहे. त्यामुळे तुम्ही उपोषण सोडा,’ असे आवाहन करत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

सर्व मागण्या राज्यस्तरीय, सरकार तुम्हाला उगाच पुढे करतयं – जरांगे


जरांगे उपोषणावर ठाम असून त्यांनी आशिमा मित्तल यांना विनंती करत म्हंटले, “कलेक्टर मॅडम, तुम्ही आलात पण या गोष्टी तुमच्या स्तरावरील नाहीत. या सर्व मागण्या राज्यस्तरीय आहेत. सरकार तुम्हाला उगाच पुढे करत आहे. या मागण्यांशी तुमचा थेट संबंध नाही, त्यामुळे तुमची एनर्जी वाया घालवू नका. मी तुमचा सन्मान करतो, पण मी तुमचे ऐकणार नाही. यानंतर तुम्ही येऊ नका,” असे मनोज जरांगे यांनी अशीमा मित्तल यांना सांगितले.

शेअर करा