मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jalana News: जरांगे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस; अंबादास दानवेंनी घेतली भेट

Jalana News जालना : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सोमवारी (दि.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

जरांगे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस; अंबादास दानवेंनी घेतली भेट सरकारकडून तोडगा निघाला नाही तर मुंबईकडे कूच करण्याची शक्यता
जरांगे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस; अंबादास दानवेंनी घेतली भेट सरकारकडून तोडगा निघाला नाही तर मुंबईकडे कूच करण्याची शक्यता

Jalna News: सरकारकडून तोडगा निघाला नाही तर मुंबईकडे कूच करण्याची शक्यता



Jalana News जालना : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सोमवारी (दि. ७) दहाव्या दिवशीही सुरू आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सोमवारी अंतरवाली सराटी येथे जरांगे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Jalana News
मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय उपचार तसेच पाणी घेणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून त्यांना मोठा थकवा जाणवत आहे. सरकारकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने जरांगे उपोषणावर ठाम आहेत.
दरम्यान, सरकारकडून पुन्हा शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत पाठवले जाणार का, जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का आणि ते उपोषण मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दररोज राज्याच्या विविध भागांतून नागरिक जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल होत असून, आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत आहे.https://maharashtramirror.com/ Jalana News
सरकारकडून तोडगा न निघाल्यास येत्या १२ सप्टेंबरनंतर मनोज जरांगे मुंबईकडे जाण्याची शक्यता आहे. याबाबत अंतरवाली सराटीत बैठक घेऊन जरांगे घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सरकार आणि जरांगे यांच्यातील चर्चेतून पुढील काही दिवसांत काय तोडगा निघतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.https://maharashtramirror.com/ Jalana News

शेअर करा