मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : नव्या पाठ्यपुस्तकांसोबत मूल्यांकनाचा पेच;शिक्षक संभ्रमात पहिल्या सत्राच्या परीक्षा तोंडावर, मूल्यांकनाच्या नियमावलीची प्रतीक्षा; जुन्या सीसीई पद्धतीचा आधार घेण्याची वेळ

Pune News : पुणे : राज्यातील शालेय शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) अंतर्गत नवे बदल स्वीकारले जात असतानाच विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

नव्या पाठ्यपुस्तकांसोबत मूल्यांकनाचा पेच;शिक्षक संभ्रमात
नव्या पाठ्यपुस्तकांसोबत मूल्यांकनाचा पेच;शिक्षक संभ्रमात

Pune News : पुणे : राज्यातील शालेय शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) अंतर्गत नवे बदल स्वीकारले जात असतानाच विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली आहेत. मात्र, पहिल्या सत्राच्या परीक्षा जवळ आल्या असतानाही नव्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नेमके कसे करावे, याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गुणदानासाठी कोणती पद्धत अवलंबावी, या संभ्रमात राज्यभरातील शिक्षक सापडले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

२०१० च्या जुन्या मूल्यांकन पद्धतीचा आधार


नव्या अभ्यासक्रमानुसार मूल्यांकनाची नियमावली अद्याप जाहीर न झाल्याने शिक्षकांना २० ऑगस्ट २०१० रोजीच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या (सीसीई) जुन्या पद्धतीचा आधार घ्यावा लागत आहे. नव्या पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी त्यानुसार गुणदानाची प्रक्रिया स्पष्ट नसल्याने प्रत्यक्ष अध्यापन आणि मूल्यांकन यांचा मेळ कसा घालायचा, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

गुणदानाच्या गणितात नवे प्रश्न


जुन्या मूल्यांकन पद्धतीनुसार कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांचे केवळ संकलित मूल्यमापन केले जात होते. मात्र, नव्या अभ्यासक्रमातील बदलांमुळे या विषयांच्या मूल्यांकनाबाबत नव्याने स्पष्टता आवश्यक आहे. त्यातच इयत्ता सहावीसाठी व्यावसायिक शिक्षण हा १०० गुणांचा नवीन विषय समाविष्ट करण्यात आला आहे. या विषयासाठी मूल्यांकनाचे निकष कोणते असतील, गुणदान कसे करायचे आणि परीक्षेच्या नोंदी कशा ठेवायच्या, याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने शिक्षकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

शिक्षकांचे लक्ष शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे
नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना मूल्यांकनाची पद्धतही वेळेत निश्चित होणे अपेक्षित आहे. मात्र, परीक्षा जवळ आल्या असतानाही नियमावली उपलब्ध नसल्याने जुन्याच पद्धतीनुसार गुण द्यायचे की नव्या सूचनांची प्रतीक्षा करायची, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करून मूल्यांकनाबाबतचा संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा