मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : एकल महिलांसाठी सरकार आणणार नवी योजना

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेनंतर राज्य सरकार आता एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना आणण्याच्या तयारीत आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

एकल महिलांसाठी सरकार आणणार नवी योजना राज्यात १२ लाखांहून अधिक एकल महिला; विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून तीन लाख महिलांची माहिती संकलित
एकल महिलांसाठी सरकार आणणार नवी योजना राज्यात १२ लाखांहून अधिक एकल महिला; विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून तीन लाख महिलांची माहिती संकलित

Pune News : राज्यात १२ लाखांहून अधिक एकल महिला; विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून तीन लाख महिलांची माहिती संकलित

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेनंतर राज्य सरकार आता एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना आणण्याच्या तयारीत आहे. राज्यातील एकल महिलांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या महिलांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. महाराष्ट्रात १२ लाखांहून अधिक एकल महिला असल्याचेही त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune news

अखिल भारतीय पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया, मुंबई यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या वडील नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून संबंधित कुटुंबांतील एकल महिलांची माहितीही समोर येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सर्वेक्षणातून तीन लाख एकल महिलांची माहिती

आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून सुमारे तीन लाख एकल महिलांची माहिती मिळाली आहे. उर्वरित महिलांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. राज्यात एकूण १२ लाखांपेक्षा अधिक एकल महिला असल्याचा अंदाज असल्याचे पाटील यांनी सांगितले.

“महिला अनेक कठीण परिस्थितींना सामोरे जात स्वतःच्या बळावर संपूर्ण संसार सांभाळतात. त्यामुळे अशा महिलांकडे विशेष लक्ष देण्याचे काम सुरू आहे,” असे पाटील म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांचे वडील नाहीत, अशा विद्यार्थ्यांनाही प्रस्तावित योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘लाडकी बहीण’नंतर आता एकल महिलांवर लक्ष

राज्य सरकारने यापूर्वी महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

आता एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने या प्रस्तावित योजनेचे स्वरूप, पात्रतेचे निकष आणि नेमके कोणते लाभ दिले जाणार, याकडे लक्ष लागले आहे. सरकारकडून याबाबत सविस्तर घोषणा झाल्यानंतर योजनेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा