मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : १६६८ पासून महाराष्ट्र-फ्रान्स व्यापारी वारसा ; डॉ. अमोल शिंदे यांचे IFCCI सेमिनारमध्ये प्रतिपादन

Pune News :पुणे : तीन शतकांहून अधिक काळाच्या व्यापारी परंपरेचा वारसा सांगत, महाराष्ट्राने जागतिक गुंतवणुकीसाठी आपली दारे अधिक खुली केल्याचे MIDC चे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

१६६८ पासून महाराष्ट्र-फ्रान्स व्यापारी वारसा ; डॉ. अमोल शिंदे यांचे IFCCI सेमिनारमध्ये प्रतिपादन
१६६८ पासून महाराष्ट्र-फ्रान्स व्यापारी वारसा ; डॉ. अमोल शिंदे यांचे IFCCI सेमिनारमध्ये प्रतिपादन

Pune News :पुणे : तीन शतकांहून अधिक काळाच्या व्यापारी परंपरेचा वारसा सांगत, महाराष्ट्राने जागतिक गुंतवणुकीसाठी आपली दारे अधिक खुली केल्याचे MIDC चे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Pune News

पुणे येथे झालेल्या पहिल्या इंडो-फ्रेंच मॅन्युफॅक्चरिंग सेमिनारमध्ये बोलताना डॉ. शिंदे यांनी हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ दिला. यावेळी एमआयडीसी (MIDC)चे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (गुंतवणूक प्रोत्साहन) डॉ. अमोल शिंदे, मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्यदूत (Consul General) पॅट्रिक लेव्हेरिनो, आयएफसीसीआय (IFCCI)चे प्रादेशिक संचालिका (पश्चिम विभाग) श्वेता पाहुजा, आयएफसीसीआय (IFCCI) उद्योग समितीचे उपाध्यक्ष अरुण सधीश, महिला व बालकल्याण समिती, पुणे जिल्हा परिषदचे सभापती अंकिता पाटील, कंपनी सेक्रेटरी अभिजीत मोडक यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. अमोल शिंदे म्हणाले, "महाराष्ट्र आणि फ्रान्स यांच्यातील पहिला अधिकृत व्यावसायिक संबंध १६६८ मध्ये प्रस्थापित झाला, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला राजापूर (कोकण) येथे वखार उभारण्याची परवानगी दिली होती,"

याच ऐतिहासिक नात्याला आधुनिकतेची जोड देताना, त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या गुंतवणूक सुलभतेच्या उपाययोजनांची माहिती दिली. यामध्ये IFCCI-MIDC भागीदारी, MIDC कंट्री डेस्क, MILAAP लँड पोर्टल, MAITRI 2.0 आणि इन्व्हेस्ट महाराष्ट्र या उपक्रमांचा समावेश आहे.

त्यानंतर झालेल्या CEO Roundtable मध्ये त्यांनी उद्योजकांच्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली. फ्रान्सचे मुंबईतील महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हरिनो यांच्यासह ८० हून अधिक दिग्गज उद्योजक या सेमिनारला उपस्थित होते.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा