मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : माण मेट्रो स्थानकातील पाणीगळतीबाबत पीएमआरडीएची सारवासारव

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : शिवजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका-३ च्या उद्घाटनाला अवघे दोन दिवस उरले असताना, माण मेट्रो स्थानकात रविवारी सायंकाळी झालेल्या पाणीगळतीमुळे मोठा गदारोळ झाला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

माण मेट्रो स्थानकातील पाणीगळतीबाबत पीएमआरडीएची सारवासारव
माण मेट्रो स्थानकातील पाणीगळतीबाबत पीएमआरडीएची सारवासारव

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : शिवजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका-३ च्या उद्घाटनाला अवघे दोन दिवस उरले असताना, माण मेट्रो स्थानकात रविवारी सायंकाळी झालेल्या पाणीगळतीमुळे मोठा गदारोळ झाला. स्थानकाच्या छतातून पाणी गळत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीएमआरडीएने यावर स्पष्टीकरण दिले आहे. मान स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या उघड्या स्लॅबवरील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी वाहिनी तात्पुरती तुंबल्याने हा प्रकार घडला असून, मेट्रोच्या मूळ बांधकामात कोणताही दोष नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, माण मेट्रो स्थानकाच्या प्रवेश संरचनेचा टेरेस स्लॅब हा थेट आकाशाच्या दिशेने उघडा आहे. रविवारी झालेल्या पावसात टेरेसवरील पावसाच्या पाणी निचरा करणाऱ्या वाहिनीमध्ये तात्पुरता अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पाणी स्लॅबवरच साचले आणि साचलेले पाणी स्टेशन बॉक्स व प्रवेश संरचनेमधील मोकळ्या जागेतून झिरपून मेझॅनाइन स्तरावर पोहोचले.प्रशासनाने तातडीने कारवाई करत हा अडथळा दूर केला असून आता पाण्याचा निचरा पूर्ववत सुरू झाला असल्याचे पठाण यांनी सांगितले.

उद्घाटनाआधीच कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
पावसादरम्यान माण स्थानकाच्या छतातून पाणी गळत असल्याचे आणि ते प्रवाशांच्या वाहतुकीच्या जागेत साचत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. मेट्रो कर्मचारी बादल्या आणि वायपर वापरून पाणी बाहेर काढताना दिसत होते. या दृश्यांमुळे उद्घाटनापूर्वीच कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
३ नोव्हेंबर रोजी बहुप्रतिक्षित २३ स्थानकांच्या ‘शिवजीनगर ते हिंजवडी’ मेट्रो लाईन-३ चे भव्य उद्घाटन बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यानंतर ४ नोव्हेंबरपासून १७ स्थानकांवर प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होणार आहे. परंतु, उद्घाटनाच्या तोंडावरच घडलेल्या या घटनेमुळे स्थानकातील इलेक्ट्रिकल वायरिंग, लिफ्ट, एस्कलेटर आणि इतर पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबाबत आयटी क्षेत्रातील व्यावसायिक व स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने संपूर्ण चाचणी करूनच सेवा सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा