Bluemafton News : प्रिटोरियसचा विश्वविक्रम; गेलचा 13 वर्षांचा विक्रम मोडला
Bluemafton News :ब्लूमफॉन्टेन : दक्षिण आफ्रिकेचा 20 वर्षीय फलंदाज लुआन-द्रे प्रिटोरियसने T20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
1 मिनिट वाचन

Bluemafton News :79 चेंडूंत नाबाद 188 धावांचा तडाखा; 15 चौकार, 13 षटकारांसह T20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास

Bluemafton News :ब्लूमफॉन्टेन : दक्षिण आफ्रिकेचा 20 वर्षीय फलंदाज लुआन-द्रे प्रिटोरियसने T20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. टायटन्सकडून नाइट्सविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या 79 चेंडूंत नाबाद 188 धावांची वादळी खेळी केली. यासह त्याने ख्रिस गेलच्या नाबाद 175 धावांचा 13 वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मागे टाकत पुरुष T20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली.https://maharashtramirror.com/ maharashtra mirror
CSA T20 स्पर्धेतील या सामन्यात प्रिटोरियसने सुरुवातीपासूनच नाइट्सच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने आपल्या खेळीत 15 चौकार आणि 13 षटकारांची आतषबाजी केली. 237.97 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना त्याने केवळ 24 चेंडूंत अर्धशतक आणि 40 चेंडूंत शतक पूर्ण केले. त्यानंतर 58 चेंडूंत 150 धावांचा टप्पाही गाठला. https://maharashtramirror.com/ maharashtra mirror
गेलचा विक्रम अखेर मोडला
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलने 2013 च्या IPLमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद 175 धावा केल्या होत्या. पुरुष T20 क्रिकेटमधील हा विक्रम तब्बल 13 वर्षे कायम होता. प्रिटोरियसने 188 धावांची नाबाद खेळी करत गेलचा हा विक्रम मोडला.
प्रिटोरियसच्या तुफानी खेळीच्या जोरावर टायटन्सने 20 षटकांत तीन बाद 267 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात नाइट्सचा संघ 17.2 षटकांत 143 धावांत गारद झाला. त्यामुळे टायटन्सने हा सामना तब्बल 124 धावांनी जिंकला.
द्विशतक अवघ्या 12 धावांनी हुकले
प्रिटोरियसला T20 क्रिकेटमधील द्विशतक नोंदवण्याची संधी होती. मात्र, टायटन्सची 20 षटके पूर्ण झाल्याने तो नाबाद 188 धावांवर परतला आणि त्याचे द्विशतक अवघ्या 12 धावांनी हुकले. तरीही पुरुष T20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.
संक्षिप्त धावफलक : टायटन्स – 20 षटकांत 3 बाद 267 (लुआन-द्रे प्रिटोरियस नाबाद 188); नाइट्स – 17.2 षटकांत सर्वबाद 143; टायटन्स 124 धावांनी विजयी.




