मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : कुराशच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे कुरण

Pune News : पुणे, धनश्री ओतारी : महाराष्ट्रात शासकीय नोकऱ्या मिळवण्यासाठी खेळाच्या प्रमाणपत्रांचा गैरवापर करत एका मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

‘कुराश’ बनावट प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरीचा मिळवला लाभ
‘कुराश’ बनावट प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरीचा मिळवला लाभ

Pune News : पुणे, धनश्री ओतारी : महाराष्ट्रात शासकीय नोकऱ्या मिळवण्यासाठी खेळाच्या प्रमाणपत्रांचा गैरवापर करत एका मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. कुराश या प्राचीन जपानी-उझबेकिस्तान प्रकारच्या जॅकेट कुस्ती खेळाची खोटी क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रे तयार करून त्याद्वारे वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या शासकीय नोकऱ्या मिळवल्याचा संशय आहे. याप्रकरणी महाराष्ट्र कुराश असोसिएशनच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात पसरली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

अंकुश विठ्ठल नगर (वय ४०, अध्यक्ष, महाराष्ट्र कुराश असोसिएशन) आणि शिवाजी जयवंत साळुंखे (वय ४६, सचिव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नांवे असून, त्यांना ३ सप्टेंबर रोजी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त (गुन्हे) शंकर खटके करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर कुराश स्पर्धा झाल्याचे भासवले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ ते २०२३ या कालावधीत तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर कुराश स्पर्धा झाल्याचे भासवून कागदपत्रे तयार करण्यात आली, प्रत्यक्षात बऱ्याच स्पर्धा आयोजितच केल्या नव्हत्या. क्रीडा विभागाच्या माहितीनुसार, २०२३ पासून कुराश प्रमाणपत्रांच्या आधारे ७१ उमेदवारांनी पोलिस दल व इतर शासकीय विभागांत नोकऱ्या मिळवल्या आहेत. तपासादरम्यान प्रमाणपत्रांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत https://maharashtramirror.com/ Pune News

प्रत्यक्ष स्पर्धा होण्याआधी किंवा स्पर्धा संपल्यानंतर बऱ्याच काळाने सहभागाच्या याद्या तयार केल्याचे निष्पन्न झाले. २०१६ मधील काही जुन्या कागदपत्रांवर उस्मानाबादऐवजी ‘धाराशिव’ आणि औरंगाबादऐवजी ‘छत्रपती संभाजीनगर’ असा उल्लेख आढळला, प्रत्यक्षात ही नामकरणे २०२३ मध्ये झाली होती. कागदपत्रांवर महिलांच्या स्पर्धांमध्ये पुरुष खेळाडूंची नावे टाकणे, अनुक्रमांक नसणे आणि मागील तारखा टाकत जुनी पत्रे वापरल्याचे तपासात पुढे आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

रॅकेटद्वारे १२०० ते १५०० बोगस प्रमाणपत्रे वाटप करण्यात आल्याचा संशय


गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटद्वारे १२०० ते १५०० बोगस प्रमाणपत्रे वाटप करण्यात आल्याचा संशय आहे. स्पर्धांमध्ये कोणतीही शासकीय क्रीडा अधिकारी किंवा प्राधिकृत व्यक्ती उपस्थित नसतानाही केवळ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांनी प्रमाणपत्रे जारी करण्यात आली.

पुण्यासह परभणी, धाराशिव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा आयोजक, खेळाडू, प्रमाणपत्रे पुरवणारे मध्यस्थ (एजंट) आणि शासकीय क्रीडा अधिकाऱ्यांच्या भूमिकेची कसून चौकशी सुरू आहे. तसेच ड्रॅगन बोट व इतर खेळांच्या प्रमाणपत्रांचीही पडताळणी केली जात असून, यामागील आर्थिक उलाढालीचा व रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे.

काय आहे कुराश खेळ?


कुरेश' (Kurash) हा मध्य आशियातील (प्रामुख्याने उझबेकिस्तान) एक अत्यंत प्राचीन आणि पारंपारिक कुस्तीचा प्रकार आहे. हा खेळ सुमारे ३,५०० वर्षांपेक्षा जास्त जुना मानला जातो. उझबेक भाषेत 'कुरेश' या शब्दाचा अर्थ 'योग्य मार्गाने ध्येय गाठणे' असा होतो. हा खेळ खेळताना मल्ल विशेष प्रकारचे जॅकेट (ज्याला 'याक्ताक' म्हणतात) आणि बेल्ट परिधान करतात. एका खेळाडूचे जॅकेट हिरव्या रंगाचे आणि दुसऱ्याचे निळ्या रंगाचे असते. कुरेश हा प्रामुख्याने उभे राहून (Upright position) खेळायचा कुस्तीचा प्रकार आहे. यामध्ये प्रतिस्पर्ध्याच्या जॅकेट किंवा बेल्टला पकडून त्याला पाडण्याचे डावपेच आखले जातात. प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे पाठीवर पाडल्यास त्याला 'हलाल' म्हटले जाते, ज्याद्वारे थेट विजय मिळतो. सध्या आंतरराष्ट्रीय कुरेश असोसिएशनद्वारे या खेळाचे जागतिक स्तरावर नियंत्रण केले जाते. आशियाई खेळ आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कुरेशचा समावेश करण्यात आला असून जगभरात हा खेळ वेगाने लोकप्रिय होत आहे.

शेअर करा