मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ

Pune News : " पुणे महानगरपालिकेचा हा कारभार अत्यंत मनमानी आणि बेकायदेशीर आहे.

VK
Vikrant Kulkarni

3 मिनिट वाचन

उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ कोथरूड डीपी रस्त्यासाठी ४६७ झाडांचा बळी: पालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस; १५ दिवसांचा अल्टिमेटम
उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ कोथरूड डीपी रस्त्यासाठी ४६७ झाडांचा बळी: पालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस; १५ दिवसांचा अल्टिमेटम

Pune News : कोथरूड डीपी रस्त्यासाठी ४६७ झाडांचा बळी: पालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस; १५ दिवसांचा अल्टिमेटम

Pune News : "पुणे महानगरपालिकेचा हा कारभार अत्यंत मनमानी आणि बेकायदेशीर आहे. कायद्याचे उल्लंघन करून दिलेली मुदतवाढ खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने १५ दिवसांत उत्तर न दिल्यास आम्ही न्यायालयात कायदेशीर लढा अधिक तीव्र करू." - प्रा. अमीत सिंग, अर्थतज्ज्ञ व नागरिक प्रतिनिधीhttps://maharashtramirror.com/ Pune News


*कोथरूडमधील मोक्याचा भूखंड एका खासगी संस्थेला भाडेकरारावर देण्याचा निर्णय झाला
*या भूखंडावरील प्रस्तावित वृद्धाश्रमासाठी डीपी रस्ता उभारला जात असून, त्यासाठी तब्बल ४६७ झाडे तोडली जात आहेत

  • स्थानिक नागरिकांच्या मते, कोथरूड आधीच काँक्रिटच्या जंगलात बदलत असून बकाल होत चालले आहे, परंतु या गंभीर मुद्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित मंत्री-खासदार मूग गिळून गप्प आहेत
    *वृक्ष प्राधिकरणाने १९ ऑक्टोबर २०२३ रोजी एका ठरावाद्वारे कोथरूड येथील सर्व्हे नंबर १२/२ आणि १२/५ मधील २० मीटर रुंदीच्या डीपी रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी १४९ झाडे तोडण्याची आणि ३१८ झाडे अन्यत्र स्थलांतरित करण्याची परवानगी दिली होती
    *ही परवानगी २२ डिसेंबर २०२३ रोजी देण्यात आली असून, ती केवळ तीन महिन्यांसाठी वैध होती
    *तब्बल ११ ते १३ महिन्यांच्या विलंबाने या कालबाह्य झालेल्या परवानगीला परस्पर दिली दोनदा मुदतवाढ
  • धनश्री ओतारी

    Pune News : पुणे : कोथरूड येथील डीपी रोडच्या कामासाठी तब्बल ४६७ झाडे तोडण्याच्या आणि स्थलांतरित करण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या विवादास्पद परवानग्या आणि त्यांना दिलेल्या बेकायदेशीर मुदतवाढीविरोधात पुणेकर नागरिक आणि पर्यावरणप्रेमी अत्यंत आक्रमक झाले आहेत. शहरातील खालावलेली हरित कक्षाची स्थिती आणि प्रशासनाचा मनमानी कारभार पाहता, या प्रकरणाने आता मोठे राजकीय व कायदेशीर रूप धारण केले आहे.

    दरम्यान, कायदेतज्ज्ञांमार्फत महापालिका प्रशासनाला याप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

    नेमके प्रकरण काय?
    कोथरूडमधील मोक्याचा भूखंड एका खासगी संस्थेला भाडेकरारावर देण्याचा निर्णय झाला आहे. या भूखंडावरील प्रस्तावित वृद्धाश्रमासाठी डीपी रस्ता उभारला जात असून, त्यासाठी तब्बल ४६७ झाडे तोडली जात आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, कोथरूड आधीच काँक्रिटच्या जंगलात बदलत असून बकाल होत चालले आहे, परंतु या गंभीर मुद्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित मंत्री-खासदार मूग गिळून गप्प आहेत.

    पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने १९ ऑक्टोबर २०२३ रोजी एका ठरावाद्वारे कोथरूड येथील सर्व्हे नंबर १२/२ आणि १२/५ मधील २० मीटर रुंदीच्या डीपी रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी १४९ झाडे तोडण्याची आणि ३१८ झाडे अन्यत्र स्थलांतरित करण्याची परवानगी दिली होती. ही परवानगी २२ डिसेंबर २०२३ रोजी देण्यात आली असून, ती केवळ तीन महिन्यांसाठी वैध होती. नियमानुसार ही परवानगी २२ मार्च २०२४ रोजीच कालबाह्य (लॅप्स) झाली होती.

    परंतु, कोणतीही कायदेशीर तरतूद नसताना आणि प्रत्यक्ष जागेवर कोणतीही खात्री न करता महापालिकेने जुन्याच आकडेवारीच्या आधारे तब्बल ११ ते १३ महिन्यांच्या विलंबाने या कालबाह्य झालेल्या परवानगीला परस्पर मुदतवाढ दिली. अगदी अलीकडे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने पुन्हा एकदा ही मुदतवाढ मंजूर केली आहे, ज्यामुळे पुणेकरांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

    कायदेशीर नोटीस
    वकील महेश गजेंद्रगडकर यांच्यामार्फत अर्थतज्ज्ञ व प्राध्यापक अमीत सिंग आणि 'चलोपमॅक' नागरिक मंचाच्या वतीने ही नोटीस पाठवण्यात आली असून त्यात महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडे संरक्षण व जतन कायदा, १९७५ अंतर्गत एकदा मुदत संपलेली परवानगी केवळ साध्या पत्राद्वारे किंवा आदेशाने पुन्हा जिवंत करण्याचा अधिकार वृक्ष प्राधिकरणाला नाही.

    मुंबई उच्च न्यायालयाने 'एमएमआरडीए विरुद्ध युनियन ऑफ इंडिया' प्रकरणात दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार, झाडे तोडण्यापूर्वी किंवा प्रकल्पाच्या आधी पर्यायी वनीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रकरणात एकही नवीन झाड लावण्यात आलेले नाही. झाडे तोडण्यापूर्वी कायद्यानुसार नागरिकांच्या हरकती मागवणे आणि जाहीर नोटीस देणे अनिवार्य असताना, कोणत्याही प्रकारची सार्वजनिक सुनावणी न घेता ही परवानगी परस्पर वाढवण्यात आली. परवानगी देताना ६,०४१ नवीन स्थानिक जातीची झाडे लावणे, त्यांचे जिओ-टॅगिंग करणे आणि ७ वर्षे निगा राखणे बंधनकारक होते, ज्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे. असे गंभीर आरोप पालिकेवर करण्यात आले आहेत.

    प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
    या कायदेशीर नोटिसद्वारे महापालिका आयुक्त, वृक्ष अधिकारी आणि संबंधित कार्यकारी अभियंत्यांना १५ दिवसांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर वेळेत योग्य ती कारवाई झाली नाही, तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, भारतीय न्याय संहितेअंतर्गत अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच मानद न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

    शहरातील फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या हरित पट्ट्याची होणारी ही कत्तल रोखण्यासाठी पुणेकर आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून, यावर महापालिका प्रशासन नेमकी काय पावले उचलते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

    ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

    शेअर करा