मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : भरधाव कारने विद्यार्थिनींना चिरडले; एकीचा मृत्यू

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत बसथांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्याला भरधाव कारने धडक दिल्याची भीषण घटना खेड तालुक्यातील कुरकुंडी फाटा येथे घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

भरधाव कारने विद्यार्थिनींना चिरडले; एकीचा मृत्यू
भरधाव कारने विद्यार्थिनींना चिरडले; एकीचा मृत्यू

Pune News :खेड तालुक्यातील कुरकुंडी फाट्यावर अपघात; पाच विद्यार्थिनी जखमी, चालक फरार

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत बसथांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्याला भरधाव कारने धडक दिल्याची भीषण घटना खेड तालुक्यातील कुरकुंडी फाटा येथे घडली. या अपघातात अदिती नवनाथ राळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर अन्य पाच विद्यार्थिनी जखमी झाल्या. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. कुरकुंडी गावातील सात ते आठ महाविद्यालयीन विद्यार्थिनी कुरकुंडी फाटा येथील बसथांब्यावर एसटी बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी राजगुरुनगरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने विद्यार्थिनींच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. धडकेमुळे परिसरात गोंधळ उडाला.अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना तातडीने राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना अदिती राळे हिचा मृत्यू झाला. अन्य पाच विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवाराचा प्रतिनिधी वाहनात?
अपघातग्रस्त वाहनातून शिक्षक मतदारसंघाच्या एका उमेदवाराचा बूथ प्रतिनिधी पाईट मतदान केंद्राकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. वाहन घाईत असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत असले, तरी अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

चालकाला अटक करण्याची नातेवाइकांची मागणी
अपघाताची माहिती मिळताच उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अदितीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला असून, फरार चालकाला शोधून ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

या घटनेमुळे बसथांब्यांजवळील वाहतुकीचा वेग आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा