Pune News : खाशाबांचे वारसदार लवकरच मुरगुडमधून चमकतील : संजय दुधाणे कुस्तीगीरांना खाशाबा जाधव पुस्तक भेट
Pune News : पुणे : कुस्तीत अजूनही खाशाबानंतर महाराष्ट्रात ऑलिम्पिक पदक आले नाही, आता खाशाबांचे वारसदार मुरगुडमधून चमकतील असे प्रतिपादन लेखक संजय दुधाणे आज मुरगुडमधील कार्यक्रमात केले.
2 मिनिट वाचन

Pune News : पुणे : कुस्तीत अजूनही खाशाबानंतर महाराष्ट्रात ऑलिम्पिक पदक आले नाही, आता खाशाबांचे वारसदार मुरगुडमधून चमकतील असे प्रतिपादन लेखक संजय दुधाणे आज मुरगुडमधील कार्यक्रमात केले. लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल आयोजित कार्यक्रमात खाशाबा जाधव चरित्र पुस्तक कुस्तीगीरांना भेट देण्यात आली. https://maharashtramirror.com/ Pune News
जागतिक रौप्य पदक विजेती अमृता पुजारी हिच्यासह तालमीतील सात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीरांचा संजय दुधाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले,माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके,माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले, माजी नगरसेवक राहूल शिंदे, दिपक शिंदे,राजेंद्र कांबळे,नगरसेवक दत्तात्रय मंडलिक, माजी प्राचार्य महादेव कानकेकर,प्रकाश तिराळे,दयानंद खतकर आदी मान्यवर उपस्थित होते . फक्त खेळाडूच नव्हे तर जीवन संघर्ष करणाऱ्या प्रत्येकांना ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे चरित्र नेहमी प्रेरणादायी ठरेल असे मनोगत कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे पुढे म्हणाले की कुस्तीगीर खाशाबांच्या ऐतिहासिक कामगिरीला उजाळा देत खाशाबांचे चरित्र पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
खाशाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह 166 पानांनी पुस्तक सजले असून दिवगंत जेष्ठ लेखक य.दि. फडके यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. प्रा. संजय दुधाणे यांनी सखोल संशोधन करीत हे जीवन चरित्र शब्दचित्रित केले आहे. महाराष्ट्रातील नामवंत तालमींना ऑलिंपिकवीर खाशाबा पुस्तक भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर, पुणे, कराड व साताऱ्यातील खेळाडूंसाठी पुस्तक भेट देण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खाशाबांनी जिंकलेल्या पदकाच्या कामगिरीला संजय दुधाणे यांनी उजाळा देत पदकविजेत्या महिला कुस्तीगीर अमृता पुजारी, नंदीनी साळुंखे, स्वाती शिंदे, तन्वी मगदूम, यांच्याशी संवाद साधला.' यशस्वितेसाठी शारीरिक बरोबरीने मानसिक कणखरता - सकारात्मकता ही तितकीच गरजेची असते या पैलु प्रत्येक खेळाडू - प्रशिक्षणानी नेहमीच लक्ष्यात ठेवावा ' असा आग्रही सल्ला ही दुधाणे यांनी यावेळी दिला . नंदिनी साळोखे,स्वागत,प्रास्ताविक दादासो लवटे यांनी केले.सुत्रसंचालन बटू जाधव यांनी केले. आभार स्वाती शिंदे यांनी मानले.
मुरगूडमधूनच ऑलिम्पिकविजेते घडतील : संजय मंडलिक
मुरगूड केंद्रीत कोल्हापर जिल्हा स्पोर्टस हब म्हणून आगामी काळात वेगाने पुढे येईल , यासाठी ग्रामीण भागात असलेल्या युवा प्रतिभेला व्यासपीठ व्यापक प्रमाणात शासन आणि उद्योग विश्वातून उपलब्ध करून देण्यात येईल, मुरगूडमधूनच ऑलिम्पिकविजेते घडतील
अशी ग्वाही माजी खासदार प्रा . संजय मंडलिक यांनी दिली . लेखक प्रा . संजय दुधाणे यांनी खाशाबा जाधव पुस्तक त्यांना सस्नेह भेट दिले आणि क्रीडा क्षेत्र आगामी योजना संदर्भात चर्चा केली . यावेळी कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे उपस्थित होते.




